शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्य गोचर चंद्रग्रहण: ९ राशींवर पितरांची कृपा, अनेक लाभ; वरदान काळ, अनंत चतुर्दशी शुभ ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 11:57 AM

1 / 15
आगामी काळ अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. हा कालावधी वैविध्यपूर्ण असाच आहे. सोमवार, १६ सप्टेंबर रोजी सूर्याचे गोचर आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करत आहे. हा काळ कन्या संक्रांत म्हणून ओळखला जाईल. यानंतर लगेचच १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
2 / 15
अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होत आहे. तसेच या दिवशी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा असून, या दिवशी चंद्रग्रहण आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. परंतु, भारतातून ते दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे.
3 / 15
१९ सप्टेंबरपासून पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवडा सुरू होणार आहे. या दिवसापासून पंचक लागणार आहे. तर २१ तारखेला भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. सूर्याचे गोचर, चंद्रग्रहण, अनंत चतुर्दशी, पंचक, पितृ पंधरवड्याची सुरुवात, संकष्ट चतुर्थी याचा अतिशय सकारात्मक प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आगामी कालावधी कहीं खुशी कहीं गमसारखा ठरू शकतो. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. सरकारकडून विशेष सहकार्य मिळेल. लाभ आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत महत्त्वपूर्ण बदल दिसून येतील. आवडीच्या ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. परंतु, इतरांच्या भानगडीत न पडलेलेच बरे. जबाबदारी वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी सतत दक्ष राहावे लागेल. कागदोपत्री पूर्तता करताना खबरदारी घ्या. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळलेले बरे.
5 / 15
वृषभ: नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. प्रवास आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवावी. उसने पैसे देताना विचार करून द्या. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे बाहेर येईल. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च कराल. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मोठेपणा मिळेल. काही चांगली बातमी मिळेल. हातून चांगली कामे होतील. मुलांची प्रगती होईल. महत्त्वाच्या वस्तू व कागदपत्रे सांभाळा.
6 / 15
मिथुन: थोडे सावधतेने आणि संयमाने वागण्याची गरज आहे. घाईघाईत कामे करणे टाळा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. त्यासाठी लोकांची मर्जी संपादन करणे क्रमप्राप्त राहील. त्यात कमीपणा मानू नका. व्यवसायात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत राहील. कार्यक्षेत्रात जुने वाद उकरून काढू नका. बोलण्यात आणि वागण्यात सौम्यता दाखवावी लागेल.
7 / 15
कर्क: जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. काही कटू तर काही गोड अनुभव येतील. यश मिळाले म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. मदत करणाऱ्या लोकांची कदर करा. जास्त खर्च होईल, ज्यामुळे तुमचे तयार बजेट विस्कळीत होऊ शकते. नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. अहंकार बाजूला ठेवला, तर सुख, शांतता, समाधान मिळेल. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. प्रेम संबंधात जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा.
8 / 15
सिंह: करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. चांगल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. परंतु, थोडे विचारपूर्वक आणि सावधपणे पावले टाकण्याची गरज आहे. कामे चोखपणे बजावत राहा. विविध स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आत्मविश्वासाच्या बळावर सर्व अडचणींवर मात कराल. शत्रू आणि विरोधकांवर विजय मिळेल. एकाच वेळी अनेक कामे करू नका. वादग्रस्त वक्तव्ये करू नका. अडलेले काम यशस्वीपणे पार पडेल.
9 / 15
कन्या: आगामी काळ शुभ, सौभाग्यकारक आहे. व्यवहारात फायदा होऊ शकतो. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. धनलक्ष्मीची कृपा राहील. विद्यार्थ्यांसाठी शुभ, यश मिळवून देणारा काळ आहे. भागीदारीत सतर्क राहावे. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळावी. काही लोक तुमच्याविरोधात कारवाया करतील. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. घरात किरकोळ कारणावरून होणारे वाद टाळा.
10 / 15
तूळ: विविध प्रकारचे लाभ मिळू शकतात. विवाहेच्छूसाठी चांगली स्थळे चालून येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यास सुकरपणे पार पडतील. महत्त्वाच्या योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. नोकरीच्या ठिकाणी कठीण परिस्थितीत वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास तुम्हाला वाईट वाटेल. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
11 / 15
वृश्चिक: कामात विविध प्रकारचे व्यत्यय येऊ शकतात. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. कामाचा ताण वाढेल. फायदे होणार असल्याने कामाचे काही वाटणार नाही. बोलण्याचा प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात वादविवादापासून स्वतःला दूर ठेवलेलेच बरे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रेमसंबंधात उतावळेपणा टाळा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
12 / 15
धनु: करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक कामासाठी थोडी जास्त धावपळ करावी लागू शकते. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. चांगले मित्र, हितचिंतक यांच्या मदतीने ध्येयाकडे वाटचाल कराल. वादग्रस्त प्रकरणे संयमाने हाताळण्याची गरज आहे. अडचणींचा काळ जास्त वेळ टिकणार नाही; पण बोलून वाईट होऊ नका. सबुरीने वागा. नोकरीत उच्च पद मिळू शकते; पण गैरसमज होऊ शकतात.
13 / 15
मकर: विशिष्ट कामासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. अपेक्षित यश मिळेल. उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरदारांनी थोडा संयम दाखवावा, अनपेक्षित लाभ होतील. अधिकारी कामावर खुश राहतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होऊ शकतात. समाजात मान वाढेल. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतात.
14 / 15
कुंभ: मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कार्यक्षेत्र असो वा व्यवसाय, सर्वत्र परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. भरपूर लाभ मिळतील. मनातील शंकांचे योग्य व्यक्तीशी बोलून निरसन करून घ्या. मनातील आत्मविश्वास वाढीस लागेल. जीवनसाथीशी वाद टाळा. आर्थिक उलाढाली जपून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. आहाराची पथ्ये पाळा. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. नवीन संपर्क तयार होतील. विश्वासार्हता वाढेल.
15 / 15
मीन: आळशीपणा सोडावा लागेल. अपेक्षेनुसार कामात यश मिळवू शकाल. लोकांची चांगली साथ मिळेल. अनेक प्रश्न सुटतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात सन्मान मिळवू शकाल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मनातील अकारण काळजीचे विचार काढून टाका. सकारात्मक विचार कराल तर कामातील अडचणी दूर होतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024ganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४pitru pakshaपितृपक्षLunar Eclipseचंद्रग्रहणSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी