शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याचे नक्षत्र गोचर: ७ राशींना शुभ-लाभ, कामात यश; उत्पन्न वाढ, इच्छापूर्तीचा आनंदी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:04 PM

1 / 10
ज्योतिषशास्त्रानुसार सर्व नवग्रह राशींप्रमाणे नक्षत्र परिवर्तन करत असतात. नक्षत्र समूहांची मिळून रास तयार होत असते. राशीनुसार ग्रहांचे नक्षत्रात होणारे गोचरही मानवी जीवनावर प्रभाव करणारे ठरत असते. एखाद्या व्यक्तीचा कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला आहे, त्यावरूनही काही गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
2 / 10
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नक्षत्र गोचर करत आहे. ३० ऑगस्ट रोजी सूर्य पूर्वा नक्षत्रात गोचर करत आहे. विद्यमान घडीला सूर्य स्वराशीत म्हणजे सिंह राशीत विराजमान असून, सिंह संक्रांतीचा काळ सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सूर्य स्वराशीत असेल. तसेच आगामी काही दिवस सूर्य पूर्वा नक्षत्रात असेल.
3 / 10
सूर्याच्या नक्षत्र गोचराचा काही राशींना चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडी यांवर कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 10
मेष: शुभ सिद्ध होऊ शकेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. नोकरदारांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. दुसऱ्या ठिकाणाहून चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. पगार वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो.
5 / 10
मिथुन: यश मिळू शकते. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना लाभ मिळू शकतात. चांगल्या पगारासह प्रमोशन मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. व्यवसायात प्रयत्नांना यश मिळू शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
6 / 10
सिंह: सन्मान आणि प्रतिष्ठा लाभू शकेल. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील. व्यवसायात यश मिळू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले जाऊ शकेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. कुटुंब साथ देईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. मनोकामना पूर्ण होतील. कार्यशैली सुधारेल.
7 / 10
कन्या: इच्छा पूर्ण होऊ शकतील. कामातील अडथळे दूर होतील. नोकरदारांचा प्रभाव वाढेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. प्रभावशाली लोकांशी ओळख वाढेल. फायदा होईल. समाजात स्वत:ची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. वाहन व मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. सरकारी संस्थेकडून दीर्घकालीन लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
8 / 10
तूळ: विविध लाभ मिळू शकतात. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रभाव वाढेल. व्यवसायात उत्पन्न वाढीचे नवीन स्रोत मिळतील. वर्चस्व प्राप्त होईल. नशिबाची साथ मिळू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. अनेक प्रभावशाली लोकांशी ओळख वाढेल. भविष्यात फायदा होऊ शकेल.
9 / 10
धनु: भौतिक सुख मिळू शकेल. परदेशातून चांगली कमाई होऊ शकते. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. कामाच्या बाबतीत भाग्यवान सिद्ध होऊ शकता. परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भरपूर नफा मिळू शकेल. वेगाने प्रगती करू शकाल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल.
10 / 10
कुंभ: हा काळ फायदेशीर ठरू शकतो. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. फायदा होऊ शकतो. परदेशात काम करण्याची इच्छा असल्यास संधी मिळू शकते. नशिबाची साथ मिळू शकते. यश मिळवू शकाल. नवीन व्यवसायात नफा मिळू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य