शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sun Transit Sagittarius 2021: धनुर्मासारंभ: सूर्याच्या धनु प्रवेशाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल अन् करिअर चमकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 12:08 PM

1 / 9
डिसेंबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात नवग्रहांचा राजा गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करत आहे. सूर्य आणि गुरु एकमेकांचे मित्र ग्रह मानले जातात. (Sun Transit Sagittarius 2021)
2 / 9
सूर्य मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीतून धनु राशीत १६ डिसेंबर २०२१ रोजी प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला धनु संक्रांती असे म्हटले जाते. तसेच सूर्याचा धनु राशीतील प्रवेश ते मकर संक्रांती हा कालावधी धनुर्मास या नावानेही ओळखला जातो. (dhanu sankranti 2021)
3 / 9
सूर्याचे कुंडलीतील स्थान अन्य ग्रहांपेक्षा वरचे आणि विशेष मानले गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सूर्याचे राशी संक्रमण किंवा राशीबदल हा महत्त्वाचा मानला जातो. सूर्याला करिअरचा कारक मानले जाते. (Dhanurmaas 2021)
4 / 9
सूर्याच्या या राशीबदलाचे कोणत्या ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील, कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भाग्यकारक आणि करिअरसाठी प्रगतीकारक ठरू शकेल, ते जाणून घेऊया... (Surya Gochar in Dhanu Rashi 2021)
5 / 9
सूर्याचा धनु राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना भाग्यकारक ठरू शकतो. या राशीच्या नवव्या स्थानात होत असलेले सूर्याचे संक्रमण भाग्याची उत्तम साथ लाभणारे ठरू शकेल. या काळात धार्मिक तसेच आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. कुटुंबात सकारात्मक बदल घडू शकतील. पराक्रम वाढेल. आई-वडिलांशी मतभेद होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
6 / 9
सूर्याचा धनु राशीतील प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी उत्तम कालावधी असू शकेल. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा कालावधी सकारात्मक असेल. मुलांकडून आनंद मिळेल. शुभवार्ता मिळतील. आर्थिक आघाडी मजबूत होऊ शकेल. गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळू शकेल. वडिलांचा सल्ला मोलाचा ठरेल.
7 / 9
सूर्याचा होत असलेला राशीबदल धनु राशीच्या व्यक्तींना आनंददायी ठरू शकेल. अडकलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतील. निर्णयक्षमतेचा कार्यक्षेत्रात उत्तम उपयोग करून घेता येऊ शकेल. सामाजिक स्तरावर मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढू शकेल. मीडिया, राजकारण, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना हा कालावधी सकारात्मक ठरू शकेल.
8 / 9
सूर्याचा धनु राशीतील प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. सरकारी नोकरदार वर्गातील व्यक्तींची बदली होऊ शकेल. मात्र, ही बदली सकारात्मक बदल घडवू शकेल. गुंतवणुकीसाठी चांगला कालावधी. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मेहनतीचे चीज होईल.
9 / 9
सूर्याचा धनु राशीतील प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींना सुखद ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने सूर्याचा हा राशीबदल अनुकूल ठरेल. रोजगाराच्या नव्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. परदेशात जाऊन नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगला कालावधी ठरू शकेल. वडिलांकडून लाभ मिळू शकेल. आपल्या स्पष्ट बोलण्याचा सकारात्मक प्रभाव पडू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य