शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sun Transit Scorpio 2021: सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक आणि धनवृद्धीचा काळ; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:26 PM

1 / 13
ज्योतिषशास्त्रात सूर्याला नवग्रहांचा राजा मानले गेले आहे. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी सूर्य तुळ राशीतून वृश्चिक राशीत मार्गी चलनाने प्रवेश करत असून, १६ डिसेंबरपर्यंत सूर्य वृश्चिक राशीत असेल. सूर्याच्या या वृश्चिक राशीतील संक्रमणाला वृश्चिक संक्रांत असेही म्हटले जाते. सूर्याला करिअर, नेतृत्व गुण यांचा कारक मानले गेले असून, सूर्याचा हा राशीबदल काही राशीच्या व्यक्तींसाठी लाभप्रद ठरणार असून, काही राशीच्या व्यक्तीसाठी प्रतिकूल ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया... (sun transit in scorpio 2021)
2 / 13
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश संमिश्र ठरू शकेल. मात्र, घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नयेत. यामुळे धनहानी होऊ शकते. तसेच व्यवहारांत सावधगिरी बाळगावी. नोकरदार वर्गाच्या बदलीची शक्यता आहे. प्रवासाचे बेत शक्यतो टाळावेत. मानसिक संतुलनासाठी सूर्योदयावेळी प्राणायाम करावे, असे सांगितले जात आहे. (vrischika sankranti 2021)
3 / 13
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जोडीदाराशी वाद टाळावेत. रागावर नियंत्रण ठेवावे. कारणाशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. डोळे बंद करून भागीदारावर विश्वास ठेऊ नये. अन्यथा ते नुकसान कारक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. (surya in vrischika rashi in marathi)
4 / 13
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश यशकारक ठरू शकेल. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. मात्र, कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा त्रास संभवतो. पोटाच्या विकाराने आपण त्रस्त राहू शकता. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. प्रतिक्रिया देताना सावधगिरी बाळगावी. योग्य शब्दांचा वापर करून बोलावे, असे सांगितले जात आहे.
5 / 13
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश चांगला ठरू शकतो. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपल्या जोडीदारासाठी वेळ काढायला हवा. घराच्या बांधकामाची योजना करू शकता. तीर्थस्थळी जाण्याचा प्लान करू शकता. कोणत्याही वादात पडू नका. सूर्योपासना आणि पूजन लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
6 / 13
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश शुभ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडतील. प्रॉपर्टी खरेदीचा प्लान करू शकाल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच गरजूंना मदत करणे लाभदायक ठरू शकते.
7 / 13
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश चांगला ठरू शकेल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकेल. सकारात्मकता आणि आत्मविश्वासात भर पडेल. अचानक धनवृद्धीचे योग आहेत, असे सांगितले जात आहे.
8 / 13
तुळ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश सकारात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. पण, विचारपूर्वक कृती आणि निर्णय घ्यावेत. वाणीवर संयम ठेवावा. तीव्र प्रतिक्रिया देणे टाळावे. तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक समस्या हुशारीने हाताळाव्यात. रोज सूर्योदयावेळी सूर्यदेवाला अर्घ्य देणे उपयुक्त ठरू शकते.
9 / 13
वृश्चिक राशीत होत असलेला सूर्याचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकतो. कार्यक्षेत्रात यश आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील. आर्थिक आघाडी उत्तम असेल. अचानक लाभ होऊ शकतो. मात्र, डोकेदुखी, ताप अशा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
10 / 13
धनु राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कुटुंबातील सदस्यांसाठी पैसे खर्च करावे लागतील. मात्र, योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थिती योग्य राखण्यात यश मिळू शकेल. या कालावधीत कोणालाही उधारी देऊ नका. परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आगामी काळ उत्तमम ठरू शकेल.
11 / 13
मकर राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश शुभ फलदायक ठरू शकेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आनंददायी घटना घडतील. लोकप्रियता वाढेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश प्राप्त होऊ शकेल. उच्च शिक्षणासाठीचे प्रयत्न सकारात्मक ठरतील, असे सांगितले जात आहे.
12 / 13
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकेल. शुभवार्ता मिळू शकतील. नोकरदार वर्गाला प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतील. कार्यालयातील सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात फायदा होऊ शकेल. दररोज आदित्यहृदय स्तोत्राचे पठण उपयुक्त ठरू शकेल.
13 / 13
मीन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश यश, प्रगतीकारक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळतील. लोकप्रियता, ख्याती वृद्धिंगत होईल. आपल्या स्वभावाचा आपल्यालाच लाभ होऊ शकेल. गरजूंना मदत करणे उपयुक्त ठरू शकेल. दुसरीकडे, कुटुंबात तणावाचे प्रसंग येऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य