शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 7:07 AM

1 / 12
देवशयनी आषाढी एकादशी होऊन चातुर्मासाला प्रारंभ झाला आहे. या चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे चालन पालन महादेव करतात, अशी प्रचलित मान्यता आहे. चातुर्मासाच्या सुरुवातीला अनेकविध उत्तम आणि अद्भूत योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि सूर्य यांचा नवपंचम योग जुळून येत आहेत. म्हणजेच हे दोन्ही ग्रह विद्यमान स्थितीत एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या स्थानी आहेत. हा योग शुभ मानला गेला आहे. तसेच बह्म योग, रवि योग, ज्येष्ठ नक्षत्राचा संयोग जुळून आला आहे. तसेच भगवान नारायणाची विशेष कृपा होऊ शकते.
3 / 12
गुरुवार हा गुरु ग्रहाला समर्पित असल्याचे म्हटले जात आहे. तसेच गुरुवारी दत्तगुरु आणि स्वामींची सेवा, पूजन, नामस्मरण, मंत्र जप पुण्य फलदायी मानली जाते. त्यामुळे जुळून आलेल्या अद्भूत शुभ योगांसह दत्तगुरु, स्वामींची कृपा काही राशींवर होऊ शकते. जाणून घेऊया...
4 / 12
मेष: नशिबाची साथ मिळू शकेल. पार्ट टाइम व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर सकारात्मक अनुकूलता लाभू शकेल. गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक संवाद वाढवण्यात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. भावंडांचे सहकार्य मिळू शकेल.
5 / 12
वृषभ: अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. करिअरमध्ये कामातून समाधान मिळू शकेल. व्यवसायात नफा होऊ शकेल. गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना सकारात्मक बातमी मिळू शकेल.
6 / 12
कर्क: व्यवसायासाठी काही धोरणे बनवाल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना अनेकविध संधी मिळू शकतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. चांगली बातमी मिळू शकेल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. आनंददायी घटना घडू शकतील.
7 / 12
सिंह: उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरीत बदली होऊ शकते. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. अधिक आत्मविश्वास वाटेल. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल.
8 / 12
तूळ: महत्वाची माहिती मिळू शकेल. भगवान विष्णूची कृपा होऊ शकेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. यश मिळेल. जोडीदारासोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. प्रभावशाली लोकांनाही भेटू शकता.
9 / 12
धनु: चांगली बातमी मिळू शकेल. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना पुढे सरकू शकेल. आर्थिकदृष्ट्या काळ शुभ राहू शकेल. चांगले पैसे कमवू शकाल. बचत करू शकाल. कार्यशैलीत सुधारणा दिसून येईल.
10 / 12
मकर: व्यवसायात यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, नोकरी किंवा प्रवासासाठी परदेशात जायचे असेल तर सकारात्मक गोष्टी घडू शकतील.
11 / 12
कुंभ: नशिबाची साथ मिळू शकेल. कामे होऊ शकतील. मित्रांसोबतचे वाद संपुष्टात येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना गुरुंचे, शिक्षकांचे आशीर्वाद मिळू शकतील. कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा विचार करावा.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यshree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिक