शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१८ वर्षांनी सूर्य-केतु ग्रहण योग: ६ राशींना लॉटरी, शेअर बाजारात नफा; अनपेक्षित आर्थिक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 2:40 PM

1 / 9
विद्यमान स्थितीत नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कर्क राशीत असून, ऑगस्ट महिन्यात स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र, बुध आणि शनीशी अनेकविध योग जुळून येणार आहेत.
2 / 9
त्यानंतर सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत क्रूर आणि मायावी मानला गेलेला केतु ग्रह आहे. या केतु ग्रहाशी सूर्याचा ग्रहण योग जुळून येणार आहे. राहु आणि केतु दोन्ही ग्रह कायम वक्री असतात आणि एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात.
3 / 9
कन्या राशीत प्रवेशाने सूर्य आणि राहुचा समसप्तक योग जुळून येईल. सुमारे १८ वर्षांनी असे योग जुळून येत असल्याचा दावा केला जात आहे. ग्रहण योग फारसा अनुकूल मानला गेला नसला तरी काही राशींना हा योग सकारात्मक ठरू शकतो. जाणून घेऊया...
4 / 9
मेष: खूप दिवसांपासून केलेले कष्ट आता यशस्वी होऊ शकतात. करिअर उत्तम होऊ शकेल. कामाचे कौतुक होईल. प्रमोशनसह काही मोठी जबाबदारीही दिली जाऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. समाधानी राहू शकता. दृढनिश्चयी व्हाल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
5 / 9
वृषभ: विशेष लाभ मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात भरीव यशाने स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न असलेल्यांना लाभ मिळू शकतो. परदेशात शिकण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. अध्यात्माकडे अधिक कल असेल.
6 / 9
सिंह: सूर्य केतुचा ग्रहण योग फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. तुमच्या बोलण्याचा लोकांवर प्रभाव पडू शकतो. व्यावसायिकांना उधारीचे पैसे मिळू शकतात. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते.
7 / 9
वृश्चिक: सूर्य केतुचा ग्रहण योग अनुकूल ठरू शकतो. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. मोठा भाऊ आणि बहिणीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. शेअर बाजार आणि लॉटरीतून फायदा होऊ शकतो.
8 / 9
धनु: सूर्य आणि केतुचा ग्रहण योग फायदेशीर ठरू शकतो. काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. करिअरच्या दृष्टिकोनातून लाभ मिळू शकेल. नोकरदारांचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकेल. राजकारणात सक्रिय असलेल्यांना यावेळी काही पद मिळू शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.
9 / 9
मकर: प्रतिष्ठा वाढेल. लोकांना सल्ला घ्यायला आवडेल. सल्ला अनेकांना उपयोगी पडेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबाला तीर्थक्षेत्री घेऊन जाऊ शकता. निर्णय घेण्याची क्षमता चांगली असेल, ज्याचे फायदे करिअरमध्ये पाहायला मिळतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य