शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 7:07 AM

1 / 12
विद्यमान घडीला सूर्य कन्या राशीत आहे. एखाद्या राशीत प्रवेश केला की, सूर्य महिनाभर त्याच राशीत असतो. सूर्याचे हे संक्रमण कन्या संक्रांती म्हणून ओळखले जात आहे. सूर्याच्या कन्या राशीतील प्रवेशानंतर कुंभ राशीत असणाऱ्या शनीशी षडाष्टक योग जुळून आला आहे.
2 / 12
काही दिवसांपूर्वी सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत असताना स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत असणाऱ्या शनीशी समसप्तक योग जुळून आला होता. आता कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर षडाष्टक योग जुळून आला आहे. सूर्य कन्या राशीत असेपर्यंत हा योग कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
3 / 12
काही मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र आहेत. सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. त्यामुळे जुळून आलेला षडाष्टक योग काही राशींना प्रतिकूल मानला जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
वृषभ: करिअरमध्ये अचानक समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात ऑर्डर अचानक रद्द झाल्यास नुकसान होऊ शकते. समस्या वाढू शकतात. कोणत्याही योग्य सल्ल्याशिवाय मोठा निर्णय घेतल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळावे.
5 / 12
मिथुन: करिअरमध्ये वरिष्ठांमुळे मानसिक ताण आणि दबाव वाढू शकतो. तणावमुक्त राहण्यासाठी म्युझिक उपयुक्त ठरू शकेल. मालमत्ता खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पैसे गुंतवण्याचे निर्णय पुढे ढकलणे हिताचे ठरू शकेल. अन्यथा फसवणूक होण्याची चिन्हे आहेत.
6 / 12
कर्क: आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळावे. करिअरच्या क्षेत्रात आव्हाने येऊ शकतात. अत्यंत सावधपणे संवाद साधा. काही कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. प्रत्येक काम संयमाने केल्यास अनेक अडचणी टाळता येतील.
7 / 12
सिंह: आर्थिक समस्या येऊ शकतात. वैवाहिक जीवनात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गडबड करू नका. करिअरच्या समस्यांवर मात करण्यासाठी, विश्वासू मित्र किंवा नातेवाईकांशी बोला.
8 / 12
कन्या: सूर्य कन्या राशीत असून, शनीच्या षडाष्टक योगाचा प्रभाव व्यावसायिक जीवनावर दिसून येऊ शकतो. विरोधक कट रचू शकतात. कार्यालयीन राजकारणापासून जितके दूर राहाल तितके चांगले. कर्जाचे व्यवहारही टाळावे. अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या राशीच्या काही लोकांना सरकारी क्षेत्रातून लाभ मिळू शकतो.
9 / 12
धनु: सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग चढ-उतारांनी भरलेला असू शकतो. अनावश्यक वादात अडकू शकता. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. नकारात्मक विचारांनी भरलेल्या लोकांपासून दूर राहावे लागेल. कौटुंबिक जीवनातील लोकांशी बोलताना खूप काळजी घ्यावी. जोखमीची कामे करणे टाळावे आणि पैसे सुज्ञपणे गुंतवावेत.
10 / 12
मकर: वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. आर्थिक समस्या वाढू शकतात. फसवणूक होऊ शकते. प्रतिष्ठा, सामाजिक मानहानी होऊ शकते. काम न केल्याचा आरोप होऊ शकतो. प्रत्येक कामात काळजी घ्यावी लागेल. स्वतःची मते इतरांवर लादणे टाळा. करिअरमध्ये अचानक बदली किंवा वारंवार नोकरी बदलण्याची परिस्थिती येऊ शकते. करिअर, आर्थिक बाबतीत अस्थिरता-अनिश्चितता त्रासदायक ठरू शकते.
11 / 12
कुंभ: या राशीचा स्वामी शनी असून, सूर्याशी जुळून आलेल्या षडाष्टक योगामुळे कामे बिघडू शकतात. सल्ल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नका, ज्याबद्दल जास्त माहिती नाही. नकारात्मक विचार टाळा. दैनंदिन कामाकडे लक्ष द्यावे. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, ते दूर करण्यासाठी जोडीदाराशी शांततेने बोला.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य