पिता-पुत्राची युती ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पदोन्नती लाभ; उत्पन्न वाढ, ६ ग्रहांची कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:56 IST
1 / 12ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह ठरलेल्या चलनानुसार नियमितपणे गोचर करत असतात. नवग्रह केवळ राशी नाही, तर नक्षत्रातही गोचर करत असतात. काही ग्रहांच्या गोचराचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यातील एक असेच मोठे प्रभावी गोचर २०२५ च्या मार्च महिन्यात होत आहे.2 / 12नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मकर राशीची साडेसाती संपणार असून, मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. तत्पूर्वी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. काही मान्यतांनुसार सूर्य आणि शनि पिता-पुत्र मानले गेले असून, एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. 3 / 12मीन राशीत आताच्या घडीला बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह विराजमान आहेत. सूर्याच्या प्रवेशानंतर बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग जुळून येणार आहे. तसेच ग्रहण योगही जुळून येणार आहे. मार्च महिन्याची सांगता होताना ६ ग्रहांचा दुर्मिळ युती योग मीन राशीत जुळून येणार आहे. याचा अनेक राशींना शुभ-लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.4 / 12मेष: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केल्याने उत्पन्न वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कामात यश मिळेल. तसेच काही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता.5 / 12वृषभ: धाडसी निर्णयांचा फायदा होऊ शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल. सुख-सुविधा मिळू शकतील. करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकेल. व्यापारात नफा होण्याची शक्यता आहे.6 / 12मिथुन: धनलाभ होऊ शकतो. नोकरीत पदोन्नती होऊ शकेल. काम आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. लोखंड, तेल, पेट्रोल, खनिजे किंवा सूर्य देवाशी संबंधित कामातून चांगला नफा मिळू शकतो. तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या आणि व्यापारी वर्गातील लोकांसाठी परिस्थिती अनुकूल राहील. नफा आणि प्रगतीची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचे सुख मिळू शकते. 7 / 12कर्क: विविध लाभ मिळू शकतील. भाग्याची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी बदलीची शक्यता असू शकते. कारकिर्दीत खूप चांगल्या संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होईल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.8 / 12सिंह: धैर्यात आणि शौर्यात वाढ दिसून येईल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ असेल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असेल. सर्व निर्णय पूर्ण आत्मविश्वासाने घ्याल. धाडसी निर्णयांचा फायदा होऊ शकेल. आर्थिक परिस्थिती खूप चांगली राहणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.9 / 12तूळ: बऱ्याच काळापासून करत असलेले काम यशस्वी होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. व्यवसायात यश मिळू शकते. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. अनेक मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे.10 / 12धनु: गुंतवणूक आणि नवीन योजनांचा फायदा होईल. अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमीन व्यवहारातून चांगला नफा मिळू शकतो. अनेक स्रोतांकडून पैसे कमवू शकता. काही नवीन फायदेशीर प्रकल्पांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले निकाल मिळतील. यश मिळेल. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. 11 / 12कुंभ: अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाची योजना आखणाऱ्या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. परदेशी संपर्कांद्वारे आयात-निर्यात कामात यश मिळाले. या काळात तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या आणि व्यापारी वर्गातील लोकांसाठी परिस्थिती अनुकूल राहील. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.