शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याचा बुध नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना दीप अमावास्या मंगलमय, सुखाचा काळ; अनुकूलता लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 1:03 PM

1 / 9
चातुर्मासातील पहिली अमावास्या ही आषाढ अमावास्या असून, दीप अमावास्या म्हणून साजरी केली जाते. यानंतर श्रावण मासाला सुरुवात होते. या अमावास्येला दिव्यांची पूजा केली जाते. दिवे स्वच्छ करून प्रज्वलित केले जातात. पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. घराघरात दीप पूजन करण्याची परंपरा आहे.
2 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कर्क राशीत विराजमान असून, ०२ ऑगस्ट रोजी अश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे. अश्लेषा नक्षत्र शुभ मानले गेले आहे. सूर्याचा अश्लेषा नक्षत्रातील प्रवेश काही राशींना लाभदायक मानला गेला आहे.
3 / 9
तसेच वृषभ राशीत मंगळ आणि गुरूची युती, सिंह राशीत शुक्र आणि बुध यांचा लक्ष्मी नारायण योग असे अनेक योग दीप अमावास्येच्या निमित्ताने जुळून येत आहेत. सूर्याचा नक्षत्र प्रवेश कोणत्या राशींना सकारात्मक प्रभावाचा, अनुकूल ठरू शकतो, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष: कामाचे कौतुक होईल. मेहनतीचे फळ मिळेल. उच्च अधिकारी बढती देऊ शकतात किंवा काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. यश मिळू शकेल. व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. आर्थिक लाभ होऊ शकेल. समाजात लोकप्रियता, मान-सन्मान वाढेल.
5 / 9
कर्क: सूर्य कर्क राशीत विराजमान आहे. या राशीच्या लोकांना सूर्य नक्षत्र बदलाचा विशेष लाभ होऊ शकेल. गुरू आणि मंगळाची कृपाही लाभू शकेल. मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. भगवान शिवाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.
6 / 9
सिंह: बुधाच्या नक्षत्रात सूर्याचे गोचर फायदेशीर ठरू शकते. पदोन्नती मिळू शकते. पगार वाढू शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. काही मोठे प्रकल्प साध्य होऊ शकतात. नेतृत्वाची गुण वाढू शकतात. अतिरिक्त उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
7 / 9
वृश्चिक: आश्लेषा नक्षत्रात सूर्य प्रवेश शुभ ठरू शकतो. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. नशिबाची साथ मिळू शकेल. नोकरी आणि व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. प्रत्येक कामात अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. सुख, आनंद आणि समृद्धी वाढेल. जुन्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीत तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. अडकलेले पैसेही परत मिळण्याचे संकेत आहेत.
8 / 9
धनु: आश्लेषा नक्षत्रातील सूर्य गोचराने सूर्यासोबत बुधाची विशेष कृपा असू शकेल. विशेष लाभ मिळू शकतो. स्थिती सुधारू शकते. यश मिळू शकते. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कमाईचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येऊ शकेल.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास