surya gochar in hasta september 2024 know about these 6 zodiac signs get success prosperity money
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:14 AM1 / 9पितृपक्ष सुरू आहे. यातच ज्योतिषशास्त्रानुसार, अनेकविध शुभ योग जुळून आले आहेत. सूर्य कन्या राशीत आहे. याच राशीत केतु विराजमान आहे. तसेच मीन राशीत असलेल्या राहु ग्रहाशी समसप्तक योग आहे. यामुळे ग्रहण योग जुळून आला आहे. तसेच पितृपक्ष कालसर्प ग्रहण योगात आहे.2 / 9कन्या राशीतून गोचर असताना सूर्य नक्षत्र बदलही करणार आहे. सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश करत आहे. यावेळी वाहन मोर असणार आहे. केतु विराजमान असल्यामुळे दुर्मिळ योग जुळून येत आहे. १० ऑक्टोबरपर्यंत सूर्य हस्त नक्षत्रात असेल, त्यानंतर चित्र नक्षत्रात प्रवेश करेल.3 / 9असा योग सुमारे १११ वर्षांनी जुळून आल्याचा दावा काही मान्यतांनुसार केला जात आहे. या शुभ योगाचा शुभ प्रभाव काही राशींवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 9मेष: प्रत्येक क्षेत्रात प्रगती करता येऊ शकेल. करिअरच्या क्षेत्रात स्थिरता दिसू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. एखादा प्रकल्प किंवा ऑर्डर मिळू शकते. अनपेक्षित स्त्रोतांकडून लाभ मिळू शकतो. जोडीदाराशी चांगला समन्वय राहील. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.5 / 9सिंह: चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सर्व चिंता दूर होतील. अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. उत्तम कल्पनांसह व्यवसाय हाताळण्यास सक्षम असाल. चांगला नफा मिळवू शकाल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. वाहन आणि मालमत्तेत लाभाची शक्यता निर्माण होत आहे.6 / 9कन्या: आत्मविश्वास वाढू शकतो. नातेसंबंध निर्माण करण्याचे काम केले पाहिजे. या काळात सर्वांशी नाते अधिक घट्ट होणार आहे. कार्यशैली सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुंदर असेल. भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो.7 / 9वृश्चिक: लाभदायक सिद्ध होऊ शकेल. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. हा काळ बदलाचा ठरेल. योजनांवर काम सुरू करू शकता. गुंतवणुकीचा फायदा होईल. आयात-निर्याती संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.8 / 9धनु: जीवनात आनंद येऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. प्रमोशनसह चांगला पगार वाढू शकतो. कामावर समाधानी राहू शकता. बनवलेले धोरण व्यवसायात उपयोगी पडू शकते. भरपूर नफा कमवू शकता. प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देताना दिसतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.9 / 9मकर: भाग्यवान ठरू शकता. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मनोकामना पूर्ण होतील. पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications