शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना महिनाभर लाभ; तूळ संक्रांत तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 11:43 AM

1 / 15
ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशी गोचर करणार आहेत. यातील महत्त्वाचे राशीपरिवर्तन हे सूर्य ग्रहाचे मानले जात आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोबर रोजी बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत प्रवेश करत आहे. (surya gochar in tula rashi 2022)
2 / 15
सूर्याच्या या राशी संक्रमणाला तूळ संक्रांत असे म्हटले जाते. आगामी सुमारे महिनाभर सूर्य तूळ राशीत विराजमान असेल. यानंतर नोव्हेंबर महिन्यात सूर्य मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्यानंतर लगेचच शुक्र ग्रहही तूळ राशीत विराजमान होत आहे. या दोन्ही ग्रहांचा शुभ योग दिवाळी सणासाठी अत्यंत लाभदायक मानला जात आहे. (sun transit in libra 2022)
3 / 15
तूळ रास ही सूर्याची नीच रास मानली जाते. म्हणजेच सूर्य तूळ राशीत दुर्बल मानला गेला आहे. सूर्याच्या या राशीपरिवर्तनाचा काही राशीच्या व्यक्तींना शुभ लाभ होऊ शकेल. तर काही राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. दिवाळी, दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... (tula sankranti 2022)
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत संमिश्र ठरू शकेल. सूर्य नीच राशीत असल्यामुळे तुम्हाला क्षेत्रात काहीसे नुकसान सोसावे लागू शकते. आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. रागाच्या भरात संबंध खराब करून घेऊ नका. सूर्याला जल अर्घ्य दिल्याने समस्या कमी होऊ शकतील, असे म्हटले जात आहे.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत उत्तम ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमची उर्जा आणि उत्साह वाढेल. मात्र, डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. शक्यल्यास रविवारी गुळाचे दान करावे.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत अनुकूल ठरू शकेल. करिअरमध्ये यश मिळू शकते. पण तुम्ही घरातील कामात अधि व्यस्त राहाल. मुलाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत संमिश्र ठरू शकेल. वैवाहिक जीवन आणि करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. आर्थिक आघाडीवर कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. लांबचा प्रवास टाळा. शक्य असल्यास नियमितपणे सूर्य मंत्राचा जप करा.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत सकारात्मक ठरू शकेल. राशीस्वामी असलेल्या सूर्याचे गोचर तुमच्या करिअरसाठी अनुकूल ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक नुकसान आणि वाद टाळावा. शक्य असल्यास नियमितपणे सूर्याला अर्घ्य जरूर द्यावे.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत संमिश्र ठरू शकेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल आणि कामे वेळेवर पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. तब्येत बिघडू शकते. कामाचा ताण त्रासदायक ठरू शकतो. शक्य असल्यास नियमितपणे हनुमंतांचे पूजन करावे.
10 / 15
तूळ राशीत होत असलेला सूर्याचा प्रवेश आणि तूळ संक्रांत या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. करिअरमधील चढ-उतार त्रासदायक ठरू शकतात. पदोन्नती आणि नफा मिळविण्यात अडचण येऊ शकते. सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. शक्य असल्यास नियमितपणे सूर्य मंत्राचा जप करावा.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी विरोधक नुकसान पोहोण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागू शकतो. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. शक्य असल्यास दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत संमिश्र ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर नुकसान होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुमचे पैसे कुठे पडू शकतात किंवा चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत संमिश्र ठरू शकेल. नोकरी-व्यवसायात नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी असलेली चांगली वागणूक उपयुक्त ठरू शकेल. दुसऱ्यांचे वाहन चालवणे टाळावे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत संमिश्र ठरू शकेल. हे संक्रमण वैवाहिक जीवनासाठी प्रतिकूल ठरू शकेल. प्रेमात अडचणी येऊ शकतात. स्वभाव आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. शक्य असल्यास नियमितपणे सूर्य मंत्राचा जप करावा.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशीपरिवर्तन तूळ संक्रांत फलदायी सिद्ध होऊ शकेल. करिअरच्या दृष्टीने सूर्याचे संक्रमण सरासरी फलदायी ठरेल. नोकरीशी संबंधित निर्णय हुशारीने घ्यावे. आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य