शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना लाभ, धनवृद्धी योग; नशिबाची साथ, सौभाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 1:19 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह नियमित कालांतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. तसेच हे नवग्रह नियमित कालांतराने एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करत असतात. यानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य रोहिणी नक्षत्रात विराजमान झाला आहे.
2 / 9
आताच्या घडीला सूर्य शुक्राचे स्वामीत्व असलेल्या वृषभ राशीत विराजमान आहे. जून महिन्यात सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत असलेल्या सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. रोहिणी नक्षत्र चंद्राचे प्रिय नक्षत्र मानले जाते.
3 / 9
सूर्याचा रोहिणी नक्षत्रात होणारा प्रवेश काही राशींसाठी अतिशय शुभ मानले गेले आहे. हा काळ या राशींसाठी सौभाग्याचा काळ ठरू शकतो. करिअरच्या दृष्टिनेही हा काळ सकारात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश यश, प्रगतीकारक ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी असलेले संबंध दृढ होऊ शकतील. एखाद्या गोष्टीतून वा घटनेतून प्रेरणा मिळू शकेल. महत्त्वाकांक्षी योजना आखू शकाल. शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकता.
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. या काळात नेतृत्व क्षमता चांगली असू शकेल. चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसू शकेल. लोक आकर्षित होतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. मेहनतीने आणि समर्पणाने चांगले नाव आणि पैसा कमावण्यात यशस्वी होऊ शकाल. समाजात प्रतिष्ठा वाढू शकेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश लाभदायक ठरू शकेल. धनलाभ होऊ शकेल. कारकीर्द चांगली होऊ शकेल. उत्पन्नाचे स्रोत चांगले असू शकतील. कोणत्याही व्यवसायाचा भाग झालात तर ते चांगले ठरू शकेल. व्यक्तिमत्व मजबूत होऊ शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. अन्य लोक तुमचे म्हणणे ऐकून घेऊ शकतील. तुमची मते पटू शकतील.
7 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश यशकारक ठरू शकेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. कारकीर्द चांगली बहरू शकेल. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतील. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल. कामात खूप व्यस्त असाल. एकंदरीत सूर्याचे हे संक्रमण फलदायी ठरू शकेल.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये यश, प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. कठोर परिश्रम घ्यावे लागतील. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल. प्रयत्न वाढवावे लागतील. आदर मिळू शकेल. दृढनिश्चयाने कामे हाती घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतील. क्रीडा क्षेत्रातील लोकांचे करिअर चांगले होऊ शकते.
9 / 9
नवग्रहांचा राजा सूर्य नेतृत्व, दृष्टी, कुशाग्रता, सन्मान, धैर्य, संयम, उत्साह, आरोग्य, वैद्यकीय विज्ञान, कीर्ती प्रसिद्धी यांचा कारक मानला जातो. सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. याचप्रमाणे सूर्याचे नक्षत्र गोचरही महत्त्वाचे मानले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य