शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सूर्य-शनीच्या स्थानात बदल: ‘या’ ४ राशींचा भाग्योदय, दिलासादायक काळ; पिता-पुत्र शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:41 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी हे पितापुत्र मानले गेले आहेत. जून महिन्यात या दोन्ही ग्रहांच्या स्थानात बदल होत आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १५ जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाला मिथुन संक्रांत असे संबोधले जाते.
2 / 9
तर दुसरीकडे नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी १७ जून रोजी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री होणार आहे. कुंभ राशीची साडेसाती सुरू असून, दुसरा टप्पा सुरू आहे. सुमारे ४ महिने शनी वक्री अवस्थेत राहणार आहे. यानंतर कुंभ राशीत शनी मार्गी होणार आहे.
3 / 9
सूर्याचे राशीसंक्रमण आणि शनीचे वक्री होणे ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे मानले गेले आहेत. याचा काही राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो. काही राशीच्या व्यक्तींना करिअर, कुटुंब याबाबतीत लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या ४ लकी राशी? जाणून घ्या...
4 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि शनीचा स्थानबदल सकारात्मक ठरू शकतो. पद, प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बढती मिळू शकते. पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. आदर वाढू शकेल. भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर काम वेगाने पुढे जाऊ शकेल. जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण होतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये शुभ परिणाम मिळू शकतील.
5 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि शनीचा स्थानबदल शुभ ठरू शकेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. सर्व प्रकारचे त्रास आणि समस्या दूर होऊ शकतील. कामांत यश मिळू शकेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विचारांची व्याप्ती वाढू शकेल. शुभ कार्यावर पैसे खर्च होतील.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि शनीचा स्थानबदल अनुकूल ठरू शकेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकेल. विस्तार होऊ शकेल. नातेवाईकांना भेटू शकाल. कार्यक्षेत्रात अनुकूल बदल होऊ शकतील. प्रतिष्ठा वाढू शकेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याची योजना आखू शकता. चांगला समन्वय राहू शकेल.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि शनीचा स्थानबदल यशकारक ठरू शकेल. नोकरीत पदोन्नती मिळू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्यांना फायदा होऊ शकेल. विरोधकांवर विजय मिळवू शकाल. व्यवसायाशी संबंधित कोणते नवीन काम करू शकता. धार्मिक प्रवासाचे योग जुळून येऊ शकतील.
8 / 9
१५ जून रोजी सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर सुमारे महिनाभर सूर्य याच राशीत विराजमान असेल. जुलै महिन्यात सूर्य चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्याचा कर्क राशीतील प्रवेशाचा काळ कर्क संक्रांत म्हणूनही ओळखला जाईल.
9 / 9
शनीदेव आताच्या घडीला स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. सन २०२५ पर्यंत शनी याच राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. शनी न्यायाधीश असल्याने जसे तुम्ही कर्म कराल, तसा तो न्याय करतो, असे म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य