शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Swapan Sashtra Scary Dreams Meaning : भीतीदायक स्वप्ने दिसल्यास घाबरू नका, मिळू शकतात शुभ संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:44 PM

1 / 6
Scary Dreams : रात्री झोपेत अनेकदा तुम्हाला काही स्वप्न पडत असल्याचं समजत असेल. काही वेळा आपण स्वप्नात असं काही पाहतो ज्यामुळे आपल्याला भीतीही वाटते. स्वप्न कायम आपल्याला भविष्याशी निगडीत घटनांचे संकेत देत असतात. भविष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ अशा सर्व घटनांबाबत आपल्याला स्वप्न शास्त्रात सांगण्यात आलंय.
2 / 6
स्वप्न शास्त्रात एखाद्या व्यक्तीला घराचं बांधकाम होताना दिसत असेल तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमची आर्थिक परिस्थिती अधिक चांगली होऊ शकते. याशिवाय अशा व्यक्तीला धनलाभाचीही शक्यता असते.
3 / 6
कधीतरी तुम्ही कोणाच्या तोंडून स्वप्नात साप दिसला होता, असंही ऐकलं असेल. जरी तुम्हाला स्वप्नात साप दिसला तरी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. तुमच्यासोबत काहीही अशुभ घडणार नाही. स्वप्नात साप दिसल्यानं लवकरच यश मिळू शकतं असं म्हटलं जात.
4 / 6
जर कोणत्याही व्यक्तीला स्वप्नात पोपट दिसला, तर त्याचा संबंध त्या व्यक्तीच्या जीवनाशीच असतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पोपट दिसणं शुभ संकेत मानला जातो. असं स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीला कोणत्या न कोणत्या कारणानं पैसा मिळण्याची शक्यता वाढते.
5 / 6
जर तुम्हाला स्वप्नात भिंतीवर असलेली पाल दिसल्यास तुमच्यासोबत काही शुभ घडणार असल्याचे संकेत म्हटले जातात. याशिवाय तुम्हाला लवकरच धनलाभ होऊ शकतो, असेही याचे संकेत असू शकतात.
6 / 6
आपल्याला कोणती स्वप्न पडतील यावर आपला कोणताही कंट्रोल नसतो. जर यात तुम्ही स्वत:चं मृत अवस्थेत दिसत असाल तरी हे शुभ संकेत मानले जातात. स्वप्नात स्वत:ला मृतावस्थेत पाहिल्यानं तुमची आयु वाढण्याचे संकेत असल्याचं म्हटलं जातं.