The sooner you learn these five things in life, the more you will benefit!
आयुष्यात जेवढ्या लवकर 'या' पाच गोष्टी शिकाल तेवढा जास्त तुमचा फायदा होईल! By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 11:26 AM1 / 5एखादी उपासना दुसऱ्यांच्या सांगण्यावरून सुरु करताना आपला विश्वास किती आहे हे तपासून बघा. कारण कोणतीही गोष्ट दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपण करतो, ती बळे बळे करतो. मात्र ज्या गोष्टी स्वयंस्फूर्तीने करतो त्या मनापासून करतो. निदान उपासनेच्या बाबतीत त्यात विश्वास, समर्पण असायला हवे. अन्यथा ती केवळ पोपटपंची होईल, उपासना नाही!2 / 5जेव्हा आपण आई वडिलांच्या पैशांवर मौज करतो, तेव्हा पैशांची किंमत कळत नाही. परंतु जेव्हा स्वकष्टाने कमावलेला पैसा खर्च होऊ लागतो, तेव्हा आपल्याला पै-पै ची किंमत कळते. म्हणून परदेशात वयाच्या अठराव्या वर्षांनंतर मुलांना स्वावलंबी होण्यावर भर दिला जातो. याउलट आपल्याकडे पुढच्या सात पिढ्यांची आयती सोय कशी होईल यावर भर दिला जातो. मात्र पैशांची किंमत कळली तरच व्यक्तीचा झपाट्याने विकास होऊ शकतो. 3 / 5सद्यस्थितीत ऐकून घेणारे कोणी नाही अशी अनेकांची खंत असते. कारण इथे प्रत्येकाला प्रत्येक विषयात भरभरून बोलायचे असते. मात्र ऐकणारा कान कोणाजवळ नसतो. त्यामुळे विचारांची घुसमट होते. तसेच समोरच्याचे बोलणे ऐकून न घेता आपले विचार प्रगट केल्याने आपण तोंडघशी पडू शकतो, गैरसमज होऊ शकतो किंवा समोरच्यांकडून आपला अपमान होऊ शकतो. या तिन्ही गोष्टी टाळण्यासाठी आधी समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यायला शिका. 4 / 5आपले ध्येय गाठण्यासाठी काही जणांना सतत प्रोत्साहन देणारी व्यक्ती सोबत लागते. मात्र बाहेरून मिळालेले प्रोत्साहन फार काळ आपली ऊर्जा टिकवू शकत नाही. याउलट जे लोक स्वयंप्रेरणेने काम करतात, ते कोणतेही अपयश सहज पचवू शकतात आणि पुन्हा प्रयत्न सुरू करतात. आपणही इतरांकडून प्रेरणा मिळण्याची वाट न बघता जितक्या लवकर अपयश पचवायला शिकू तेवढ्या लवकर आपली प्रगती होईल. 5 / 5कवी सुरेश भट म्हणतात, 'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'. मृत्यू एकदाच येतो, पण तो येण्याआधी कुरकुरत राहून आपण जगण्याचे असंख्य क्षण गमावून बसतो. तो अखेरचा मृत्यूचा क्षण येण्याआधी जगून घ्यायला शिका. कारण तेव्हा जगायची कितीही इच्छा असली तरी ती संधी पुन्हा मिळणार नाही. म्हणून मरण्याआधी जगून घ्यायला शिका. आणखी वाचा Subscribe to Notifications