शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' पाच राशीच्या पुरुषांच्या भाग्यात असते सुंदर, मनमिळाऊ पत्नी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 4:04 PM

1 / 5
मिथुन राशीचे लोक आनंदी आणि उत्साही असतात. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असते, त्यामुळे मुली त्यांच्याकडे आकर्षिल्या जातात. स्त्रियांशी आदराने वागणे, मोठ्यांचा आदर करणे, समोरच्याला समजून घेणे या खुबी त्यांच्याजवळ असल्यामुळे जोडीदार मिळवण्यासाठी आणि नाते टिकवण्यासाठी त्यांना विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत.
2 / 5
सिंह राशीचे लोक खूप कणखर आणि धैर्यवान असतात मात्र जोडीदाराच्या बाबतीत ते अतिशय हळवे असतात. या स्वभावामुळे त्यांचे आपल्या जोडीदाराशी नाते स्नेहपूर्ण आणि अतूट राहते. लोकांना त्यांची भीती वाटत असली, तरी त्यांचा जोडीदार मात्र त्यांच्याबरोबर हसून खेळून आयुष्य व्यतीत करतो.
3 / 5
कन्या राशीची मुले देखणी आणि आकर्षक असतात. त्यामुळे सुंदर मुली आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात. तसेच या राशीच्या मुलांचा प्रेमळ स्वभाव मुलींना भावतो. अशा लोकांना मैत्रिणींची कमतरता नसते. मात्र त्यांच्यात जी सहचारिणी म्हणून स्थान पटकावते ती अधिक भाग्यवान असते.
4 / 5
मकर राशीच्या लोकांची बोलण्याची शैली मधुर असते आणि ते लोकांची मने सहज जिंकतात. त्यांच्या ठायी असलेली कला, प्रामाणिकपणा आणि समोरच्याला आश्चर्याचा सुखद धक्का देण्याची शैली जीवन साथीदाराचे मन जिंकण्यात खूप मदत करते. मकर राशीच्या मुलांना खूप सुंदर आणि समर्पित पत्नीचा आधार मिळतो.
5 / 5
प्रामाणिकपणा, निष्ठा, आनंदी स्वभाव हे या राशीचे गुण आहेत. हे तीनही गुण प्रत्येक मुलीला तिच्या जोडीदाराकडून अपेक्षित असतात. हे सर्व गुण मीन राशीत जन्मलेल्या मुलांमध्ये असतात. ते स्वतः देखणे असले किंवा नसले, तरीही या गुणांमुळे त्यांना जीवनसाथी खूप चांगला मिळतो आणि त्यांचे नाते छान टिकते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष