these plants are extremely auspicious. you will gain money
घरात ही झाडे लावल्याने होईल भरभराट, लक्ष्मी कायमच प्रसन्न राहिल By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 12:20 PM1 / 10दुर्वा गणपतीला खुप प्रिय असतात. दुर्वांचे झाड घरात लावल्यामुळे संतती प्राप्त होते. दुर्वा दररोज गणपतीला अर्पण करा यामुळे घरात सुखसमृद्धी नांदेल. भरभराट होईल.2 / 10वास्तू शास्त्रामध्ये स्नेक प्लँटचे विशेष महत्त्व आहे. या प्लँटला स्टडी रुम, लिव्हिंग रुममध्ये लावल्याने यशाचा मार्ग खुला होतो. या प्लँटमुळे घरात भरभराट होते.3 / 10नारळाचे झाड घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमची दुप्पट-तिप्पट भरभराट होते. कामधंद्यात यश मिळवण्यासाठी हे प्लँट जरुर लावा.4 / 10वास्तू शास्त्रात लाजाळूच्या झाडाचे खुप महत्त्व आहे. या झाडाला घरात लावल्याने आणि दररोज पाणी दिल्याने राहु दोष दुर होतो. राहु दोषामुळे कुटुंब कलह, आर्थिक नुकसान, आजार आदी दोष निर्माण होतात.5 / 10केळ्याचं झाड हे विष्णु देवाला प्रिय आहे. केळीच्या झाडाचा गुरु ग्रहाशी संबंध असतो. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला शुभ मानण्यात आले आहे. जर व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु ग्रह मजबुत असेल तर त्याची सर्व कामे यशस्वी होतात. त्याचा भाग्योदय होतो.6 / 10लक्ष्मण झाडाचा संबंध लक्ष्मी मातेशी असतो. या झाडामुळे घर धन-धान्याने भरलेले राहते. लक्ष्मी प्रसन्न राहते. या साठी याला पुर्व किंवा पुर्व-उत्तर दिशेने लावा.7 / 10आंब्याचे झाड लावण्याने जमीनविषयक वाद दूर होतात. मग त्या व्यक्तीने ते रोपटे कुठेही लावले तरीही चालते.8 / 10घराच्या आवारात निरगुडीचे झाड असल्यास त्या घरात नेहमी सुखशांती राहते.9 / 10 व्यक्तीच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.10 / 10वास्तुशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीची इच्छा असेल तर घरात बांबूचे झाड लावावे. हे घराच्या कोणत्याही ठिकाणी लावू शकतो. मानले जाते की ते लावल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात असलेली नकारात्मकता देखील दूर होते. यासोबतच कार्यक्षेत्रातही प्रगती होते. आणखी वाचा Subscribe to Notifications