शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३१ ऑगस्टला सुकर्मा योग: ६ राशींना शुभ, दत्तगुरु कृपा करतील; शततारका नक्षत्राचा लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 7:07 AM

1 / 9
ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आहे. ऑगस्ट महिन्याची सांगता होऊन सप्टेंबर महिन्याला प्रारंभ होत आहे. ३१ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी गुरुवार आहे. देशातील अनेक ठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जात आहे. श्रावणी पौर्णिमेची सांगता या दिवशी होत आहे.
2 / 9
३१ ऑगस्ट रोजी गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवतांचे गुरु बृहस्पती यांना समर्पित असल्याचे मानले जाते. तसेच हा दिवस दत्तगुरु आणि स्वामी समर्थ महाराजांची उपासना, नामस्मरण, विशेष पूजन यांसाठी विशेष मानला जातो. या दिवशी चंद्र कुंभ राशीत असेल. कुंभ ही शनीची रास असून, शनी स्वराशीत विराजमान आहे.
3 / 9
तिसऱ्या श्रावणी गुरुवारी शततारका नक्षत्र आणि सुकर्मा योग जुळून येत आहे. ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे ६ राशींवर भगवान विष्णूची कृपा होणार आहे. जीवनात प्रगतीचा शुभ संयोग होऊ शकेल. काही ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत, हे उपाय गुरुवारी केल्याने कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होऊ शकेल. दत्तगुरुंसह भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी गुरुवार भाग्याची भक्कम साथ देणारा ठरू शकेल. नशिबाची साथ मिळाल्याने अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्य करणाऱ्यांचा मान-सन्मानात वाढ होऊ शकेल. धनवृद्धीचे शुभ योग जुळून येऊ शकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवसभर व्यापारी व्यस्त राहतील. शुभ परिणाम प्राप्त होतील. मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन आराध्याचे, लक्ष्मी-नारायण, दत्तगुरु, स्वामींचे दर्शन घ्यावे.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी गुरुवार अचानक धनलाभाचा ठरण्याची शक्यता आहे. भगवान विष्णूच्या कृपेने आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. व्यावसायिकांच्या मेहनतीला यश मिळेल. आदर वाढू शकेल. प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देता येऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये सुख, शांतता आणि समृद्धीसाठी गुरुवारी केशर, पिवळे चंदन आणि हळदीचे दान करा. यामुळे कुंडलीत गुरूची स्थितीही मजबूत होऊ शकेल.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी गुरुवार आनंददायी ठरू शकेल. घरात मजा-मस्तीचे वातावरण राहू शकेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. धार्मिक कार्याची आवड वाढू शकेल. वडिलांसोबतचे संबंध चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकेल. संवाद कौशल्य उत्कृष्ट असेल. व्यावसायिक प्रगतीसाठी गुरुवारी लक्ष्मी नारायण मंदिरात लाडू अर्पण करावेत.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी गुरुवार लाभदायक ठरू शकेल. भगवान विष्णूच्या कृपेने अडकलेले पैसे परत मिळू शकतील. कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. आदर वाढू शकेल. व्यवसायासाठी काही नवीन योजनांवर काम करू शकतात. ज्यामुळे चांगला नफा मिळेल. नोकरी करणारे उत्पन्न वाढवण्यासाठी दुसऱ्या कंपनीत जाण्याचा विचार करू शकतात. नशिबाच्या मदतीने पैसा मिळण्याचा शुभ संयोग घडेल आणि सुख-समृद्धी राहू शकेल.
8 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी गुरुवार अनुकूल ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. विवाहयोग्य व्यक्तींनाही लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. भगवान विष्णूच्या कृपेने दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. कौटुंबिक जीवनाचा आनंद घेता येऊ शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा. लक्ष्मी चालिसा पठण किंवा श्रवण करा.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी गुरुवार सकारात्मक ठरू शकेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने केलेल्या कामाचा खूप फायदा होऊ शेकल. चांगली बातमी मिळू शकेल. नातेवाईकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. मनावरील ओझे हलके होऊ शकेल. एखादा नवा व्यवसाय करार अंतिम करू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. अडथळ्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी भगवान सत्यनारायणाची कथा ऐका. गुरुवारचे व्रत करावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशल