शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यंदाच्या व्हॅलेंटाईनला 'या' सहा राशींवर होणार प्रेमवर्षाव; तुम्ही किंवा तुमच्या जोडीदाराची रास यात आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:42 PM

1 / 7
अनेकांनी या दिवसासाठी विशेष तयारी केली असेल. जोडीदाराच्या पसंती नापसंतीचा अभ्यास केला असेल. आता एवढी तपस्या फळाला यावी म्हणून ज्योतिष शास्त्रानेही काही उपायांची जोड दिली आहे, तिचा वापर केला तर पुढील सहा राशींवर प्रेम वर्षाव होईल. यात तुमची रास असेल तर उत्तमच किंवा तुमच्या जोडीदाराची रास असेल तरीही हा प्रेम सोहळा रंगत आणणारा ठरेल!
2 / 7
या राशीच्या लोकांसाठी हा व्हॅलेंटाइन डे खूप खास असणार आहे. ते त्यांचे प्रेम देखील व्यक्त करतील आणि त्यांच्या जोडीदाराकडून चांगला प्रतिसाद देखील मिळेल. लग्न करू इच्छिणारे जोडपे आपल्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देऊ शकतात. त्यांचे नाते घट्ट होईल. त्याचबरोबर व्हॅलेंटाईन वीक विवाहित जोडप्यांसाठी अधिक प्रेमदायक ठरेल. याकाळात भावनेवर आवर घाला आणि जोडीदाराच्या कलाने घ्या म्हणजे वादाला तोंड न फुटता प्रेमाचा अंकुर फुटेल.
3 / 7
कर्क राशीच्या जोडप्यांना आपले नाते लग्नात रूपांतरित करण्यासाठी ग्रहदशा उत्तम आहे.त्याप्रमाणे घरी बोलणे करू शकता. विवाहित मंडळींमध्ये प्रेम द्विगुणित होईल. परस्पर सहवास सुखदायक असेल. नाते दृढ होईल. जोडीदाराला त्याच्या पसंतीची भेट दिलीत तर ती भेट अविस्मरणीय ठरू शकेल. अहंकार मध्ये येऊ देऊ नका, नाते बहरत जाईल.
4 / 7
सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातही प्रेमाचा वर्षाव होईल. प्रेमी युगुलांचे आणि विवाहित जोडप्यांचे नाते घट्ट होईल. ज्या जोडप्यांचे कुटुंबीय लग्नाला सहमत नव्हते ते आता सहमत होऊ शकतात. अविवाहितांसाठी एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम काळ आहे. फक्त वेळ काळ पाहून आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मांडा. समोरून सकारात्मक प्रतिसादाची चिन्हं आहेत.
5 / 7
कन्या राशीच्या लोकांसाठी हा प्रेमाचा आठवडा खूप आनंदाचा असेल. अविवाहितांना त्यांचा जोडीदार मिळू शकेल. विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम-प्रणय वाढेल. सहलीची योजना आखलीत तर हे क्षण आयुष्यभर अविस्मरणीय ठरतील. काही गोष्टी जोडीदाराच्या कलाने घेतल्या तर राग लोभाचे प्रसंग हसत खेळत साजरे होतील. जोडीदाराला मान द्या, तुम्हालाही आपसूक मान मिळेल.
6 / 7
तूळ राशीच्या लोकांसाठी प्रेम सप्ताह आनंददायी ठरेल. नेहमीचे वाद, रुसवे-फुगवे असतीलच परंतु त्यातही प्रेम जाणवेल. जोडीदार तापट असेल तर तुम्ही सामंजस्याने घ्या. प्रत्येक गोष्टीत समन्वय साधण्याची कला तुम्हाला अवगत आहेच. त्यानुसार आताही भावनेवर आवर घातलात तर नांदा सौख्य भरे हा आशीर्वाद तुम्हाला फळेल. मग तुम्ही विवाहित असो व अविवाहित, सामंजस्याने परिस्थिती हाताळा. आनंदी व्हाल.
7 / 7
कुंभ राशीच्या लोकांना प्रेम सप्ताह अविस्मरणीय ठरू शकेल. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ आनंददायी ठरणारा असेल तर अविवाहित युगुलांसाठी प्रेमाचे रूपांतर लग्नात करून देणारा ठरू शकेल. घरच्यांचा पाठिंबा मिळेल. सहजीवनाची सुरुवात सुखद होईल. जोडीदाराच्या कलाने काही गोष्टी घेतल्या तर नाते दृढ होईल. एकमेकांचा विश्वास संपादन करू शकाल.
टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेAstrologyफलज्योतिष