The three zodiac signs that succeed in making decisions; find out
'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे' हा फंडा वापरून निर्णय घेण्यात यशस्वी होणाऱ्या 'या' तीन राशी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 2:59 PM1 / 4ज्योतिशास्त्र सांगते, बारा राशींपैकी तीन राशी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर असतात. निर्णय घेणे म्हणजे तरी नेमके काय, तर पुढे जे होईल त्याची जबाबदारी घेण्यास सिद्ध असणे. पुढील तीन राशींमध्ये हा आत्मविश्वास ठळकपणे दिसून येतो. त्या राशी कोणत्या हे जाणून घेऊ. 2 / 4कन्या राशीचे लोक अतिशय नम्र, मृदू अंतःकरणाचे आणि भावनिक असतात. मात्र निर्णय घेताना ते स्वार्थी होतात. आपला फायदा तोटा पाहून मगच ते निर्णय घेतात. ते आपली प्रतिमा उजळ ठेवण्यासाठी इतरांसमोर चांगले बनतात. इतरांचे कितीही नुकसान झाले तरी हरकत नाही ते स्वतःची बाजू जपतात. 3 / 4मकर राशीचे लोक निर्णय घेताना सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतील पण निर्णय घेण्याची वेळ आली की स्वतःच्या विवेक बुद्धीला जे पटेल तोच निर्णय घेतील. शनी देवाच्या कृपेने या लोकांमध्ये भावना आणि तटस्थपणा दोन्ही समप्रमाणात असतो. ते चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत नाहीत. जे योग्य आहे तीच बाजू लावून धरतात. यात स्वतःचे नुकसान झाले तरी ते न्यायाच्या बाजून कौल देतात. 4 / 4कुंभ राशीच्या लोकांचे निर्णय सतत बदलत असतात. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे निर्णय बदलत राहतात. त्यामुळे त्यांची गैरसोय कधीच होत नाही. नको तिथे भावनिक न होता ते परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतात. ते बुद्धिमान असतात आणि त्यांनी जे काही करायचे ठरवले ते करतात. ते त्यांची बुद्धिमत्ता केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या भल्यासाठी वापरतात. आणखी वाचा Subscribe to Notifications