शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुभ त्रिग्रही योग: ५ राशींना सर्वोत्तम, ५ राशींना संमिश्र, तुमच्यावर कसा असेल प्रभाव? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 10:13 AM

1 / 15
जुलै महिन्यात अनेक ज्योतिषीय योग जुळून येत आहेत. यातील काही योग अत्यंत शुभ मानले गेले आहेत. नवग्रहातील महत्त्वाचे आणि प्रभावी ग्रह स्थानबदल करत असल्याचा प्रभाव सर्व राशींवर असल्याचे पाहायला मिळू शकेल. (trigrahi yoga in gemini 2022)
2 / 15
यातच मिथुन राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. आताच्या घडीला बुध आणि सूर्य मिथुन राशीत विराजमान आहे, तर शुक्र ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश होत आहे. या राशीपरिवर्तनानंतर मिथुन राशीत सूर्य, बुध, शुक्र या तीन ग्रहांचा शुभ योग जुळून येत आहे. शुक्र मिथुन राशीत ७ ऑगस्टपर्यंत विराजमान असेल. (maha lakshmi narayan yoga 2022)
3 / 15
शुक्र आणि बुधच्या युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योगही जुळून येत आहे. तर दुसरीकडे सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योगही मिथुन राशीत जुळून येत आहे. मिथुन राशीतील त्रिग्रही, लक्ष्मी-नारायण आणि बुधादित्य योगाचा तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घेऊया... (budhaditya yoga in gemini 2022)
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींच्या कामातील अडथळे दूर होतील आणि नशीब तुम्हाला साथ देईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. मिळकत उत्तम होईल आणि बचत होईल. प्रवास लाभदायक ठरू शकतील. भावंडांची काळजी घ्या. कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळेल. वैवाहिक जीवनही सामान्य राहील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना घरातील वडीलधाऱ्यांची मदत मिळेल. पैशाची स्थिती चांगली राहील आणि लोक तुमच्या वागण्याने खुश होतील. तुम्हाला कुटुंबातील सदस्याचे सहकार्य मिळेल. मात्र, कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. तुमच्या टीमच्या निष्काळजीपणामुळे तणाव आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने हा महिना खूप महत्त्वाचा ठरेल. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. कोणासोबत भागीदारीत काम करत असाल तर फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक समस्या आणि सुविधांच्या अभावाला सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन अस्थिर असू शकते. यावेळी तुमचा आत्मविश्वास कमी असू शकतो आणि तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत नसाल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना उत्पन्नातील अडथळे या काळात दूर होतील. मित्रांकडून उत्तम सहकार्य मिळेल. या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित फायदे मिळतील. छोट्या प्रवासात फायदा होईल आणि परिस्थिती अनुकूल राहील. शुक्राचे परिवर्तन पैशाची स्थिती मजबूत करेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना सुख-सुविधांचा पुरेपूर लाभ मिळेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरीही तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या कामात समाधानी असाल. जे काम हातात घ्याल, त्यात यश मिळेल. संक्रमण काळात पैशाची स्थितीही चांगली राहील आणि अडकलेला पैसा परत येऊ शकेल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा होईल. आर्थिक लाभाची जोरदार शक्यता आहे आणि आपण व्यवसायात मोठा करार करू शकता. संक्रमण काळात, करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अनेक मोठ्या संधी मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक समस्या आणि अनियंत्रित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. या काळात कामाचा ताण जास्त राहील. तुम्हाला आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदार चांगली कामगिरी करतील आणि ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा मजबूत होईल. या काळात तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे.
13 / 15
मकर राशीचे व्यक्तींना सदर कालावधी संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला लाभ मिळाला तरी या काळात तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करू शकणार नाही. या काळात तुमच्यावर नोकरीचा दबाव जास्त राहू शकतो. वैयक्तिक आघाडीवर, शुक्राचे राशीसंक्रमण तुमच्यासाठी अनुकूल होणार नाही.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम येतील आणि उत्पन्न वाढेल. बॉस आणि वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील आणि त्यांचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना या काळात मोठे यश मिळू शकते. प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देईल आणि तुम्हाला यश मिळेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना सदर काळ संमिश्र ठरू शकतो. मालमत्ता किंवा वाहन खरेदीमध्ये गुंतवणूक करू नये, कारण असे केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरादर वर्गाला सावधगिरीने काम करण्याची नितांत गरज आहे. तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य