शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अष्टलक्ष्मी राजयोग! ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; त्रिग्रहांचे शुभाशिर्वाद, सर्वोत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 11:20 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या वेळोवेळी राशीपरिवर्तनाने काही शुभ, तर काही प्रतिकूल योग तयार होत असतात. या योगांचा परिणाम थेट मानवी जीवनावर आणि देशावर आणि जगावर दिसून येतो. ११ नोव्हेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अष्टलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. (trigraha yoga in vrischika rashi 2022)
2 / 9
शुक्राच्या वृश्चिक प्रवेशानंतर नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध १३ नोव्हेंबर रोजी प्रवेश करत आहे. यानंतर १६ नोव्हेंबरला नवग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे वृश्चिक राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. या योगाचा फायदा तीन राशींच्या व्यक्तींना होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नवग्रहांचा सेनापती वक्री चलनाने वृषभ राशीत जाणार आहे.
3 / 9
त्रिग्रही योगासह अष्टलक्ष्मी योग, बुधादित्य योग, लक्ष्मी नारायण योग असेही योग जुळून येत आहे. हे योग सूर्य, बुध, शुक्र या तीन ग्रहांमुळे तयार होतात, असे सांगितले जाते. या शुभ योगांचा तीन राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत, त्या तीन राशी, जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना वृश्चिक राशीतील शुभ योग यशकारक ठरू शकेल. कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धनलाभ होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. धार्मिक कार्यांत सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना वृश्चिक राशीतील शुभ योग लाभदायक ठरू शकेल. धनलाभ होऊ शकतो. व्यवहार आणि गुंतवणुकीत फायदा होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. कामात यश मिळण्याचे योगही बनत आहेत.
6 / 9
वृश्चिक राशीतच तयार होत असलेल्या शुभ योगांचा या राशीच्या व्यक्तींनाही फायदा मिळू शकतो. आर्थिक बाजू मजबूत होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायासाठी काळ शुभ राहील.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना वृश्चिक राशीतील शुभ योग विशेष फलदायी सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या अकराव्या स्थानी हा योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होऊ शकतात. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. नवा व्यापार सुरु करण्यासाठी हा कालावधी अनुकूल ठरू शकतो.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना वृश्चिक राशीतील शुभ योग उत्तम ठरू शकेल. या राशीच्या लोकांना नोकरीचे नवे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच काही लोकांना कार्यक्षेत्राच्या ठिकाणी नव्या जबाबदारीही मिळू शकतात. या कालावधीमध्ये आर्थिक बाजू मजबूत राहील. तसेच अचानकच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना वृश्चिक राशीतील शुभ योग यशकारक ठरू शकतात. शुभ फळ मिळेल. धनलाभ होईल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. करिअर आणि व्यापारात यश मिळू शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. रखडलेली सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन वाहन किंवा आलिशान वस्तू खरेदी करू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य