शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 7:07 AM

1 / 10
सप्टेंबर महिन्याची सांगता होत आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात बुध तूळ राशीत, शुक्र वृश्चिक राशीत, सूर्य तूळ राशीत, मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर बुध महिन्यात दुसऱ्यांदा राशी गोचर करणार असून, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
2 / 10
तत्पूर्वी बुध ग्रह स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत आहे. या राशीत सूर्य आणि केतु हे दोन्ही ग्रह विराजमान आहेत. सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग जुळून येत असून, केतु आणि बुध यांचा युती योग जुळून येत आहे. यामुळे कन्या राशीत बुध, सूर्य आणि केतु यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे.
3 / 10
सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि मान-सन्मान देणारा राजयोग असे वर्णन बुधादित्य राजयोगाचे करण्यात येते. या राजयोगाचा कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकतो. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 10
वृषभ: त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. पैसे किंवा व्यवसायाशी संबंधित अशा बातम्या मिळू शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होईल. मुलांशी संबंधित काही बातम्या मिळू शकतात. मुलाला नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांची प्रगती होऊ शकेल. नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. प्रेमसंबंधात यश मिळू शकते.
5 / 10
कर्क: सुख, समृद्धी आणि यश मिळू शकेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते त्यांना अपेक्षित संधी मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर योजना फलदायी ठरण्याची शक्यता आहे. मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सत्ता आणि सरकारशी संबंधित योजनांचा लाभ घेऊ शकाल. मार्केटिंग आणि कमिशनशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ शुभ ठरू शकेल.
6 / 10
सिंह: त्रिग्रही बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात असे अनेक सौदे मिळू शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होईल. नोकरदारांची प्रगती होईल. नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संवाद क्षमता आणि पद्धत सुधारू शकेल.
7 / 10
तूळ: प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. इच्छित पदोन्नती किंवा बदलीसाठी वाट पाहत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळेल. सत्तेतील बड्या लोकांची साथ मिळेल. परीक्षा स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.
8 / 10
वृश्चिक: त्रिग्रही बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकतो. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात अनेक नवीन सौदे मिळवू शकता. गुंतवणुकीचा फायदा होईल. आयात आणि निर्यातीशी संबंधित व्यवसायिकांना चांगला लाभ मिळू शकतो.
9 / 10
धनु: नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात केंद्रित असेल. मोठा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. दोघांमधील परस्पर समंजसपणा वाढेल.
10 / 10
मीन: चांगली बातमी मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसू शकतील. समस्यांचे निराकरण होईल. नोकरदारांसाठी काळ अनुकूल आहे. इच्छित बदली मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि सन्मान मिळाल्याने उत्साही राहाल. पुढे जाण्यात यशस्वी व्हाल. कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास