शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tulsi Vastu Tips: तुळशीचे रोप देते आगामी शुभ अशुभ घटनांचे संकेत; कसे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 1:05 PM

1 / 7
हे निकष जाणून घेण्याआधी सामान्य अनुमान काढू. ज्या घरात बहरलेली तुळस असते, त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. तर जिथे वाळलेली तुळस दिसते, तिथे घरात कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधायचे.
2 / 7
सद्यस्थितीत वेळेअभावी अनेकांचे घराकडे, अंगणाकडे आपणच लावलेल्या बाग बगीच्याकडे दुर्लक्ष होते, ती बाब वेगळी. मात्र नैसर्गिकरित्या ज्यावेळी तुळशीत बदल दिसू लागतात, त्यावेळी ती कोणते संकेत देत असते ते जाणून घेऊ.
3 / 7
जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून छान. याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे.
4 / 7
जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली, तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे. अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे. तुळशीजवळ उभे राहून श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसुक्त म्हटले पाहिजे. वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते.
5 / 7
तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक वाळायला लागले, तर ते येणाऱ्या संकटाचे संकेत देते. शिशिरातील पानगळती वेगळी! पण अचानक पडझड होऊ लागली तर ते अशुभ संकेत आहेत असे समजावे. तुळशीचे रोप वातावरणातील नकारात्मक शक्ती पटकन शोषून घेते. पण ते रोपच वाळले, तर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम वास्तूवर होतो. अकारण कलह वाढतात, अनावश्यक खर्च होतात, घरातले लोक आजारी पडतात, इ गोष्टींचा अनुभव येतो. म्हणून तुळशीच्या रोपांची योग्य ती काळजी घ्यायला हवी.
6 / 7
तुळशीची हिरवी पानेही अचानक पिवळी पडून गळून पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून तुमचे पैसे हुशारीने खर्च करावेत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीजवळ दररोज तुपाचा दिवा लावावा.
7 / 7
अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात. ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा गमावला जाऊ शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तिथून उचला, नाहीतर तिथे मुंग्या येतील.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र