शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

७ वर्षांनी ‘या’ ग्रहाचे गोचर: ७ राशींना अनुकूल, अचानक मोठा फायदा-प्रगती; उत्पन्नात वाढ, लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 7:07 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने नवग्रहांचा अभ्यास केला जात असला तरी नवग्रहांच्या व्यक्तिरिक्त आणखी काही ग्रहांचा अंतर्भाव केला गेला असून, त्याचे गोचर, प्रभाव, कुंडलीतील स्थान, कारकत्व यांचा विचार करून त्यानुसार भविष्य कथन किंवा अंदाज बांधले जातात. नवग्रहांच्या यादीत नसला, तरी ज्योतिषशास्त्रात ज्याला स्थान देण्यात आले आहे, असा ग्रह म्हणजे युरेनस म्हणजेच हर्षल ग्रह.
2 / 15
युरेनस हर्षल ग्रहाने ०१ जून रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे युरेनस हर्षल ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ८४ वर्षे लागतात, असे सांगितले जाते. त्यामुळे एका राशीत हर्षल ग्रह ७ वर्षे विराजमान असतो. ७ एप्रिल २०१७ रोजी हर्षल ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला होता. आता हर्षल ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला असून, पुढील ७ वर्षे तो या राशीत असेल.
3 / 15
उच्च बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, नैसर्गिक गुढता शोधण्याची विशेष आवड, गुढशास्त्र, तंत्र, मंत्र, संमोहन, मनोविज्ञान, आत्मिक शक्ती या गोष्टीचा हर्षल हा कारक ग्रह आहे. तसेच स्वभावात अनिश्चितता, विक्षिप्तपणा, लहरीपणा तिरसटपणा, आकर्षितपणा हर्षल ग्रहामुळे तयार होतो. हर्षल ग्रहाच्या गोचराचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर विशेष प्रभाव पडतो, असे सांगितले जाते. हर्षल ग्रहाच्या गोचराचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकतो, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: पैशाच्या बाबतीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. हर्षल ग्रहाची शुभ स्थिती कायम राहावी यासाठी धार्मिक स्थळाला भेट देऊन तेथील कार्यात सहकार्य करणे लाभदायक ठरू शकेल.
5 / 15
वृषभ: अचानक प्रगती होऊ शकते. मानसिक बळ मिळेल. नवीन पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करू शकाल. हर्षल ग्रहाचे शुभ परिणाम टिकवण्यासाठी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरू शकेल.
6 / 15
मिथुन: जीवनशैली सुधारण्यासाठी स्वतःवर काही पैसे खर्च करू शकता. या काळात काही प्रवास करावा लागू शकतो. घरगुती जीवन आणि आरोग्य चांगले राहू शकेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले वाटेल.
7 / 15
कर्क: उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. काही कामासाठी घरापासून दूर जाऊ शकता. तब्येतीचीही थोडी काळजी घ्यावी. कर्जाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. हर्षल ग्रहाची शुभ स्थिती टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रतिकूल स्थिती टाळण्यासाठी वस्त्रांचे दान करणे हिताचे ठरू शकेल.
8 / 15
सिंह: सुरू असलेल्या कामात अचानक काही समस्या निर्माण होऊ शकतात. उत्पन्न मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पर्यटनाला जाण्याची योजना आखू शकता. सरकारी काम किंवा सरकारी प्रक्रियेत रुची निर्माण होऊ शकते.
9 / 15
कन्या: उच्च शिक्षणाच्या संधी मिळू शकतील. पण मेहनतीशिवाय काहीही शक्य नाही हे लक्षात ठेवा. धार्मिक कार्यात आवड वाढू शकते. या काळात नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. शक्य असेल तर उत्तर पूर्व दिशेला महादेवांची तसबीर लावावी. असे करणे लाभदायी ठरू शकेल.
10 / 15
तूळ: हर्षल ग्रहाचे गोचर अनुकूल ठरू शकेल. शत्रूकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमची करविषयक कामे पूर्ण होतील. मेहनतीचे यथायोग्य फळ मिळू शकेल. हर्षल ग्रहाचा शुभ प्रभाव राहावा, यासाठी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप करावा.
11 / 15
वृश्चिक: हर्षल ग्रहाच्या गोचरामुळे भागीदारीच्या कामात फारसा फायदा होणार नाही. छोट्या प्रवासाची शक्यता राहील. जोडीदारासोबत समजुतदारीने वागावे लागू शकेल. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करावे लागतील.
12 / 15
धनु: शत्रू, विरोधक नुकसान करू शकणार नाही. चांगल्या तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. मित्रांची साथ लाभेल. हर्षल ग्रहाचा शुभ परिणाम राहावा, यासाठी सूर्याला मनोभावे नमस्कार करावा. शक्य असल्यास सूर्योदयाला अर्घ्य द्यावे.
13 / 15
मकर: शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकेल. आध्यात्मिक शिक्षणाकडेही कल असेल. प्रियकराशी संबंध चांगले राहतील. तसेच मनात चांगले, सकारात्मक विचार निर्माण होतील.
14 / 15
कुंभ: सामाजिक प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकेल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहू शकेल. आईकडून मार्गदर्शन मिळत राहील. मन चंचल राहील.
15 / 15
मीन: लेखन कार्यात सहभागी असाल तर यश नक्कीच मिळण्याची शक्यता आहे. एखादे गुढ ज्ञान किंवा रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. सोशल मीडियावर ॲक्टिव्हिटी वाढू शकते. भावंडांशी संबंध चांगले राहतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य