शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vaishakh Purnima 2022: १७६ वर्षांनी वैशाख पौर्णिमेला अद्भूत योग! ‘या’ ४ राशींच्या घरी धनाची तिजोरी भरणार; लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 7:06 PM

1 / 9
वैज्ञानिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून मे महिना अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. नवग्रहातील महत्त्वाच्या ग्रहांच्या राशीबदलासह सन २०२२ मधील पहिले चंद्रग्रहण मे महिन्यात होत आहे. यानिमित्ताने १७६ वर्षांनी विशेष योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. (vaishakh purnima 2022)
2 / 9
सोमवार, १६ मे २०२२ रोजी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला यंदाचे पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण खग्रास स्वरुपातील असणार आहे. १५ दिवसांपूर्वीच यंदाचे पहिले सूर्यग्रहण झाले होते. आता लगेचच चंद्रग्रहण होत आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण सकाळी ८ वाजून ५९ मिनिटाला सुरू होईल आणि १० वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल. (lunar eclipse may 2022)
3 / 9
भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचा सूतक काल मान्य नसेल. चंद्रग्रहण कालावधीत कोणतीही पथ्ये पाळली नाही, तरी चालतील, असे सांगितले जात आहे. हे चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिका या भागात दिसणार आहे. (chandra grahan may 2022)
4 / 9
असे मानले जाते की, ग्रहण सर्व राशीच्या व्यक्तींवर अंशतः किंवा पूर्णपणे प्रभावित करते. याच दिवशी बौद्ध पौर्णिमाही देशभरात साजरी केली जाणार आहे. यंदाच्या पहिल्या चंद्रग्रहणाचा सकारात्मक प्रभाव नेमक्या कोणत्या राशींवर पडू शकेल. कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील, ते जाणून घेऊया...
5 / 9
यंदाचे पहिले चंद्रग्रहण मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरू शकेल. या राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना बढती मिळू शकते. गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा काळ योग्य आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कर्ज घेण्याच्या निर्णय पुढे ढकलणे उपयुक्त ठरू शकेल. अतिउत्साहामुळेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
6 / 9
यंदाचे पहिले चंद्रग्रहण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. नोकरीत चांगली बढती मिळण्याची आशा आहे. कमाईचे साधन वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तणाव आणि गोंधळाच्या परिस्थितीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात. संघर्षाची परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. अज्ञात गोष्टीची भीती वाटू शकते. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
7 / 9
यंदाचे पहिले चंद्रग्रहण धनु राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकते. चांगली नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.या दिवशी तणावपूर्ण परिस्थितींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. मेहनतीचे फळ मिळेल. पैशाच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. प्रवास करणे आणि वाहन चालवणे टाळावे.
8 / 9
यंदाचे पहिले चंद्रग्रहण मकर राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक ठरू शकेल. आर्थिक समस्या सुटू शकतील तसेच जर तुम्ही कर्ज प्रकरण करण्यासाठी अर्ज केला असेल तर तो मान्य होईल, तसेच कर्जाच्या संबंधित सर्व समस्या सुटतील. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ मंडळींचे सहकार्य लाभू शकेल. तसेच सामाजिक मान-सन्मान प्राप्त होऊ शकतील.
9 / 9
दरम्यान, चंद्रग्रहणाच्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी भगवद्गीता वाचन करणे उपयुक्त ठरू शकेल. तसेच या दिवशी चंद्रदर्शन, चंद्र उपासना करावी व ॐ सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते.
टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणZodiac Signराशी भविष्य