शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vaishakh Purnima 2023: ५ मे रोजी वैशाख पौर्णिमेला राशीनुसार दान करा आणि भरघोस लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 7:00 AM

1 / 12
या राशीच्या लोकांनी या दिवशी जल दान करावे. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जल दान करण्यासारखे दुसरे पुण्य कर्म नाही. यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण जल व्यवस्था, पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा छोटासा हौद बांधून घेऊ शकता.
2 / 12
या राशीच्या लोकांनी आगामी पावासाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चपला, बूट, छत्री इत्यादी वस्तूंचे दान करावे.
3 / 12
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा, टरबूज, खरबूज इत्यादी हंगामी फळांचे दान करावे.
4 / 12
या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना छत्री दान करावी. तसेच कोणाला आवश्यक असल्यास एखादे विश्रांती स्थान उभारावे. उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूची कृपा कायम राहते, असे मानले जाते.
5 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनी गरीब लोकांना शिधा अर्थात कोरे, न शिजवलेले धान्य दान करणे हे विशेष फलदायी ठरते. दान देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण होतात.
6 / 12
कन्या राशीचे लोक अनाथाश्रम किंवा बालआश्रमात शैक्षणिक उपयोगी गोष्टी दान करू शकतात. उदा., वह्या-पुस्तक तसेच पंखा, कुलर किंवा धान्याचे दानही शुभ सिद्ध होईल.
7 / 12
या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारी झाडे लावावीत. अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करावे आणि इतरांनाही प्रवृत्त करावे.
8 / 12
या दिवशी गरजू व्यक्तींना ऋतुमानाप्रमाणे पिकणाऱ्या फळांचे दान करणे शुभ मानले जाते.
9 / 12
या राशीच्या लोकांनी धार्मिक स्थळांबाहेर तसेच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करणे फायदेशीर ठरेल. दुसऱ्यांची तहान भागवल्याने तुमच्याही जीवनात गारवा कायम राहील.
10 / 12
या राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशु-पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी. त्यांच्या रूपाने त्रिदेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
11 / 12
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरजूंना सुती कपडे दान करावे. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात.
12 / 12
या राशीच्या लोकांनी यात्रेकरूंसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी. किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिधा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करावे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष