Valentines Day 2023 Horoscope: आगामी प्रेम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 17:46 IST
1 / 14फेब्रुवारीच्या या आठवड्यात बुध हा ग्रह धनु राशीतून बाहेर पडून शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत सिंह आणि मकर राशीच्या लोकांचे व्यावसायिक प्रकल्प पूर्ण होतील आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल. त्याचबरोबर इतर राशींना उत्पन्न, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत आणि हो प्रेम सप्ताहाच्या बाबतीत हा आठवडा कसा जाईल, ते जाणून घ्या. 2 / 14मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात, कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प अनुकूल परिणाम देईल. तुम्ही ज्या संधीची वाट बघत होतात, ती संधी चालून येईल त्यामुळे नवीन कार्यक्षेत्रात पदार्पण करू शकता. प्रेम संबंध दृढ होतील, जोडीदाराची साथ लाभेल. प्रेम व्यक्त करण्याच्या विचारात असाल तर एकदा कुटुंबाचा कौल घेणे श्रेयस्कर ठरेल. जेणेकरून भविष्यात पश्चात्ताप होणार नाही. या आठवड्यापासून आर्थिक लाभ सुरू होईल आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यावसायिक बाबतीत केलेल्या प्रवासात यश मिळेल. आठवडा समाधानकारक असेल. 3 / 14वृषभ राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंद आणि सौहार्दपूर्ण वातावरण राहील. आठवड्याच्या सुरुवातीला आनंदाची बातमी मिळू शकते. या आठवड्यात केलेल्या व्यावसायिक सहलीतून संमिश्र अनुभव येतील. भावनांवर आवर घाला. प्रवासादरम्यान जास्त खर्च करू नका. प्रवासातून नवी ऊर्जा मिळेल.भूतकाळातील काही गोष्टी नव्याने समोर येतील, परिस्थितीशी संयमाने दोन हात करा. प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या काळात जोडीदाराची चांगली साथ लाभेल. त्याच्या सूचनांचे पालन करा, लाभ होईल. आठवड्याचा शेवटचा काळ अनुकूल ठरेल. 4 / 14या आठवड्यात मिथुन राशीचे लोक आपल्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवतील आणि कौटुंबिक बाबींमध्येही खूप व्यस्त राहतील. व्यावसायिक सहलींमुळे आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिक बाबतीत नवीन लोकांच्या ओळखी दीर्घकाळ लाभ देणाऱ्या ठरतील. नोकरदारांना पदोन्नतीची संधी आहे. प्रेम संबंधात संयम ठेवण्याची गरज आहे. मोकळेपणाने व्यक्त केलेले मत तुम्हाला अडचणीत आणू शकते. सध्या आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्या. पुढचे प्रश्न आपोआप सुटतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. संमिश्र घटनांचा हा काळ असेल. 5 / 14या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. कुटुंबीयांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही साध्य करू शकाल. त्यांच्या मताचा आदर ठेवा. कार्यक्षेत्रात आर्थिक वाढीचे योग आहेत. या आठवड्यापासून आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. तुम्ही तुमच्या आरोग्यावर जितके जास्त लक्ष द्याल तितके फायदे तुम्हाला मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवास टाळणे सोयीचे ठरेल. प्रेम जीवनातील एकटेपणा त्रासदायक ठरू शकतो, जोडीदाराच्या शोधात राहा, कदाचित विवाहाचा प्रश्न मार्गी लागू शकेल. 6 / 14या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाची स्थिती निर्माण होत आहे आणि उत्पन्नही वाढण्याचे संकेत आहेत. तुमच्या उत्पन्नात झालेली वाढ पाहून तुम्ही पुढच्याही आठवड्यात ऊर्जेने काम कराल. या आठवड्यात आरोग्यात चांगली सुधारणा होईल आणि स्त्री सहकारीच्या मदतीने आर्थिक प्रगतीला हातभार लागेल. व्यवसायात काही जटिल प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यात वाद निर्माण होऊ न देता शांततेने प्रश्न सोडवावेत. प्रेम जीवनात तुमचा आजवर दाखवलेला संयम तुमच्या बाजूने परिणाम देईल. मनासारखे घडेल. 7 / 14या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांची त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि हाती घेतलेले प्रकल्पही वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्ही एखाद्या चांगल्या संधीकडे आकर्षित होऊ शकता, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती निर्माण होत असून दोन गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. विरंगुळा म्हणून एखाद्या शांत निर्जन ठिकाणी केलेला प्रवास मन शांत करेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुमचे मनस्वास्थ्य सुधारेल. लव्ह लाईफमध्ये इगो येऊ देऊ नका, अकारण वादाला तोंड फुटेल. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या, अन्यथा पोटाशी संबंधित तक्रारी वाढू शकतील.8 / 14तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ राहील. आर्थिक लाभासाठी चांगली परिस्थिती निर्माण होत आहे. नोकरी, व्यवसायात वडीलधाऱ्या व्यक्तीचे मत किंवा त्यांचे सहकार्य तुमची संपत्ती वाढवण्यास उपयुक्त ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परिस्थिती संयमाने हाताळली तर ऋणानुबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याच्या कुरबुरी सुरु राहतील. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील.9 / 14वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीच्या या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि मान-सन्मान वाढेल. कठोर परिश्रम केल्याने आजवर रखडलेले स्वप्न पूर्णत्त्वाकडे जाताना दिसेल. प्रेम जीवनाला बहर येईल. स्त्री सहकारीच्या साथीने कामातला आनंद द्विगुणित होईल. तब्येतीत सुधारणा होईल. कायदेशीर बाबींमध्ये, परिणाम अचानक तुमच्या बाजूने येऊ लागतील आणि जटिल प्रश्न मार्गी लागल्याने तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आनंदाचा काळ आहे मनसोक्त जगा. 10 / 14धनु राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि तुम्ही या बाबतीत पार्टी मूडमध्ये असाल. तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उघडतील. विशेषत: गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. लव्ह लाईफमध्ये एखाद्या गोष्टीमुळे तणाव असू शकतो, तुम्हाला शब्दांवर ताबा ठेवावा लागेल. जोडीदाराचे मत लक्षात घ्या आणि विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या. वाद टाळा. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळू शकते.11 / 14या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या तब्येतीत बरीच सुधारणा होईल आणि फिटनेस राहील. या आठवड्यात तुम्ही कोणतेही आरोग्यविषयक उपक्रम सुरू केले तरी तुमचे आरोग्य नक्कीच सुधारेल. चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक कराल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. कामाच्या ठिकाणी संयम राखण्याची गरज आहे, अन्यथा त्रास वाढू शकतो. प्रेम जीवनात आनंददायी वेळ जाईल आणि परस्पर प्रेम मजबूत होईल. या आठवड्यात व्यावसायिक सहली टाळणे चांगले. आठवडा आनंददायी ठरेल. 12 / 14कुंभ राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुम्ही तुमच्या चातुर्याने तुमची कामे वेळेत पूर्ण करू शकाल. आळस सोडून गुंतवणुकीकडे लक्ष द्याल तेव्हाच आर्थिक फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी बंधने येऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात आनंद आणि सौहार्द वाढेल. या आठवड्यात केलेल्या व्यावसायिक सहलींद्वारे तुम्हाला विशेष यश मिळू शकेल. प्रेम संबंध सुदृढ होतील. काही प्रश्न बोलून सोडवणे चांगले होईल. आठवड्याच्या शेवटी अचानक भेटवस्तूही मिळू शकते.13 / 14या आठवड्यात मीन राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि सन्मानही वाढेल. कामाचे कौतुक होईल आणि तुमचे विरोधकही तुमच्या मताचा आदर करतील. या आठवड्यात केलेल्या व्यावसायिक सहलींचेही शुभ परिणाम मिळतील आणि दौरे यशस्वी होतील. कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या बाजूने काही ठोस निर्णय घ्यावे लागतील, तरच तुमचे कल्याण होईल. भावनिक कारणांमुळे अडचणी येऊ शकतील, तटस्थ विचार करा. लव्ह लाईफ आनंददायी असेल.14 / 14एकूणच काय तर हा आठवडा संमिश्र घटनांचा असेल. प्रेम सप्ताहाचा हा आठवडा असला तरी भावनांवर आवर घालून तटस्थ भूमिका घेणे इष्ट ठरेल.