Valentine's Day 2025: तुमच्या राशीला अनुकूल जोडीदार निवडाल, तर आजन्म आनंदी व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:10 IST
1 / 8विवाहित जोडप्यांचे प्रेम जीवन यशस्वी करण्यासाठी, त्यांच्या राशीचे गुण आणि दोषसुद्धा जुळणे महत्वाचे आहे. आपण अनेकदा ऐकतो की आम्ही स्वभावाने दोन टोकं आहोत, तरी संसार सुखाने करत आहोत, त्यामागे या गुण दोषांचाच मुख्य हात असतो. मग आपल्या राशीला जुळणारा जोडीदार कोणता हे ओळखण्यासाठी ज्योतिष शास्त्राने पुढील सहा राशींचे वर्तवलेले भाकीत जाणून घ्या. 2 / 8१४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेन्टाईन्स डे (Valentine's Day 2025) आहे. अजूनपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळाला नसेल तर सदर माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि समजा जर तुम्ही आधीच जोडीदार निवडलेला असेल आणि तो खाली दिलेल्या माहीनुसार तुमच्या राशीला अनुकूल नसेल तर काय खबरदारी घ्यायला हवी याचीही माहिती मिळेल. त्यासाठी आपण पहिल्या सहा राशींचे पुढच्या सहा राशींशी कसे जुळू शकते ते पाहू. 3 / 8तूळ राशीच्या लोकांचे मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांशी चांगले जुळते. या राशींशी त्यांचे प्रेम संबंध चांगले जुळतात, टिकतात. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसोबतही त्यांचे चांगले जमते. कुंभ आणि मिथुन राशीच्या लोकांशी ते थोडेफार जुळवून घेऊ शकतात. मात्र वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांशी त्यांचे अजिबात जुळत नाही. 4 / 8वृश्चिक राशीच्या लोकांचे वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांशी चांगले जुळते. मिथुन, तूळ आणि कुंभ राशीशीही त्यांचे चांगले संबंध निर्माण होतात. मीन आणि कर्क राशीच्या लोकांशी मतभेद होतात, तर मेष, सिंह आणि धनु यांच्याशी कायम शत्रुत्व निर्माण करतात. 5 / 8धनु राशीचे लोक मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांशी चांगले जुळवून घेऊ शकतात. वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांशीही त्यांचे चांगले जमते. मेष आणि सिंह राशीशी खटके उडतात आणि कर्क, वृश्चिक आणि मीन राशीचे लोक त्यांना नजरेसमोरही नको असतात. 6 / 8मकर राशीच्या लोकांचा कर्क, वृश्चिक आणि मीन राशीशी उत्तम संबंध असतो. मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांशी चांगले जमते. वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांशी सामान्य संबंध असतात. मात्र तूळ आणि कुंभ राशीशी यांचे कधीच जुळत नाही, नेहमी विरोध होतो. 7 / 8कुंभ राशीच्या लोकांचे मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांशी चांगले प्रेम संबंध असतात. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांशी चांगले जुळते. मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांशी वादविवाद होतात पण संवाद घडतो. आणि वृषभ, कन्या आणि मकर राशीचे लोक यांचे शत्रू असतात. 8 / 8मीन राशीच्या लोकांना कर्क राशीच्या लोकांचे फक्त शारीरिक आकर्षण वाटू शकते. वृश्चिक राशीशी सामान्य प्रेमसंबंध तयार होतात. वृषभ, कन्या, मकर, मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांशी जोडी जमवली तर वैवाहिक जीवन नेहमी आनंदी आणि यशस्वी बनते. मेष, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांशी यांचे पटत नाही.