शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Shastra: वास्तू शास्त्रानुसार घरात 'या' फोटोंची निवड करणे हितावह ठरते; फक्त करू नका एक चूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 5:04 PM

1 / 9
ज्याप्रमाणे आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी आपल्याला दीर्घकाळ स्मरणात राहतात, त्याप्रमाणे फोटोफ्रेम सुद्धा आपल्याला लक्षात राहतात. त्या परिणामकारक ठरतात. घरात बाळाचे, बाळकृष्णाचे, राधा कृष्णाचे फोटो नेहमीच आल्हाददायक ठरतात. त्याबरोबर पुढील फोटो फ्रेमचा वापर अवश्य करा आणि त्यामुळे होणारे फायदेही जाणून घ्या.
2 / 9
रामराज्य अनुभवता यावे अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. बाह्य जगात तसे कधी होईल माहीत नाही, पण कुटुंबीयांमध्ये परस्पराबद्दल प्रेम निर्माण व्हावे, बंधुभाव वाढावा, एकोपा वाढावा म्हणून राम दरबाराची प्रतिमा लावावी असे वास्तू शास्त्र सांगते.
3 / 9
घरात पोहोणाऱ्या मासांची प्रतिमा, छायाचित्र लावावे. अशी चित्र आल्हाददायक असतात. ती पाहूनही मन प्रसन्न राहते. माशांप्रमाणे निसर्ग चित्र सुद्धा मनावरील तणाव घालवते. आणि आजार दूर होऊन आयुष्य वाढते
4 / 9
गायीला हिंदू धर्मात गोमाता म्हणून पुजले जाते. श्रीकृष्णाच्या बासरी वादनात रममाण झालेल्या गायीची प्रतिमा भक्तिभाव जागृत करते. मन स्थिर करते. कुटुंबात वातावरण प्रसन्न राहते आणि कामाला गती मिळाल्यामुळे घरात समृद्धी येते.
5 / 9
माता सरस्वती ही विद्येची देवता आहे. जो विद्या संपादन करतो तो विवेकी वृत्तीचा घडतो. अशा सरस्वती मातेची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवल्यामुळे आपले मन शांत राहते आणि त्या प्रतिमेकडून येणारी सकारात्मक ऊर्जा अंगात संचारते व प्रत्येक निर्णय विवेकी बुद्धीने घेतला जातो.
6 / 9
हंस जेवढा देखणा तेवढाच जोडीदाराला सोबत नेणारा! त्यामुळे हंस जोडी बघायला मिळणे शुभ लक्षण मानले जाते. पती -पत्नीच्या नात्यात प्रेम वाढावे म्हणून बेडरूम मध्ये हंसांची जोडी असलेली फोटो फ्रेम लावावी.
7 / 9
धन्वंतरी ही आरोग्य देणारी देवता आहे. त्यांची प्रतिमा घरात लावली असता, त्यांच्या दर्शनाने आरोग्य चांगले राहते. आरोग्य चांगले राहिले तर अवास्तव खर्च, आजारपण यात पैसा वाया जात नाही, त्यामुळे आपसुखच आर्थिक समस्या भेडसावत नाहीत!
8 / 9
घोडे धावत असल्याची प्रतिमा वास्तू शास्त्रात अतिशय शुभ मानली जाते. त्यातही सात वेगवान घोडे शुभ मानले जातात. घोड्यांची चपळता, सळसळता उत्साह पाहता घरातील नकारात्मक वातावरण दूर होते. त्यामुळे समस्या टिकत नाही आणि उत्साहाने प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढता येतो.
9 / 9
एक पथ्य मात्र सर्वानी आवर्जून पाळावे! ते म्हणजे स्वयंपाक घर किंवा बेडरूममध्ये देवाची प्रतिमा लावू नये. देवाचे पावित्र्य जपण्यासाठी देवाची प्रतिमा तसेच मूर्ती एक तर देवघरात नाहीतर डायनिंग हॉल मध्ये लावावी पण स्वयंपाक घरात आणि बेड रूम मध्ये लावणे टाळावे!
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र