Vastu Shastra: Aloe brightens not only skin but also fortune; Learn its proper use!
Vastu Shastra: कोरफड फक्त त्वचाच नाही तर भाग्यही उजळते; जाणून घ्या तिचा सुयोग्य वापर! By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 4:36 PM1 / 5वास्तुशास्त्रात दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा वापर वास्तूसाठी कसा करून घेता येईल याचा बारकाईने अभ्यास केला आहे. हे उपाय खर्चिकही नसतात, त्यामुळे कोणीही त्याचा सहज लाभ घेऊ शकतात. चला तर आपणही कोरफडीचे लाभ जाणून घेऊया. 2 / 5जर तुम्हाला तुमच्या नोकरीत अडचणी येत असतील आणि खूप मेहनत करूनही प्रगती होत नसेल तर घरी कोरफडीचे रोप लावा. हे घरामध्ये लावल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. त्याची लागवड पश्चिम दिशेला करणे उत्तम मानले जाते. असे केल्याने जीवनातील प्रगतीचे मार्ग खुले होतात.3 / 5जर तुम्ही वैवाहिक जीवनाबाबत असमाधानी असाल आणि तुमच्या जोडीदाराशी अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडण होत असेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला कोरफडीची लागवड करावी. असे केल्याने आयुष्यात प्रेम वाढते आणि समस्या सुटू लागतात. 4 / 5जर तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच काळापासून खराब असेल आणि तुमच्या घरात पैशाची समस्या कायम असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बागेत किंवा बाल्कनीमध्ये कोरफडीचे रोप लावा. ते लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि अस्वस्थता असल्यास मन शांत होते. यासोबतच उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतात. 5 / 5कोरफडीची रोप योग्य दिशेने लावणे जितके फायदेशीर आहे तितकेच ते चुकीच्या दिशेने लावल्याने त्याचे वाईट परिणामही होतात. वास्तूनुसार कोरफडीचे रोप उत्तर-पश्चिम दिशेला लावू नये. असे केल्याने तुम्हाला अशुभ परिणाम मिळू लागतात आणि तुमच्या घरातील समस्या कमी होण्याऐवजी वाढू लागतात. या दिशेने लावलेले रोप आजरांना आमंत्रण देते. यासाठी फार काही बदल नाही तर फक्त रोपाची दिशा चुकीची असल्यास ती बदलायची आहे, फरक अनुभवाल! आणखी वाचा Subscribe to Notifications