Vastu Shastra: If you want to increase wealth, keep any one of these things in the locker!
Vastu Shastra: धनसंपत्ती वाढवायची असेल तर तिजोरीत ठेवा यापैकी कोणतीही एक वस्तू! By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 2:28 PM1 / 5कमळ हे लक्ष्मीचे आसन आहे तसेच ते विष्णूंचेही प्रिय फुल आहे. यासाठी दर शुक्रवारी देवीच्या पूजेत कमळ अर्पण करा आणि देवीचा आशीर्वाद म्हणून तिजोरीत ठेवा. दुसऱ्या दिवशी नमस्कार करून कमळ निर्माल्यात टाका. आर्थिक प्रश्न सुटेपर्यंत दर आठवड्याला हा उपाय करत राहा. तिजोरीत कमळ ठेवल्याने धनसंपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.2 / 5असे मानले जाते की हळदीचा तोडगा तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतो. अनेक धार्मिक कार्यातही याचा वापर केला जातो. यासाठी गुरुवार किंवा शुक्रवारी लाल कापडात हळकुंड गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा. या उपायाने देखील लक्ष्मी मातेची कृपा राहून धनवृद्धी होते. .3 / 5लक्ष्मी मातेला कवड्यांची माळ आवडते. लक्ष्मीचे आपल्या घरात वास्तव्य राहावे म्हणून तिजोरीत सुट्या कवड्या किंवा कवड्यांची माळ ठेवावी.विशेषतः धनत्रयोदशी किंवा लक्ष्मी पूजेत त्या देवीला घातल्या जातात. पण दिवाळी येईपर्यंत थांबून राहण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी देवीची पूजा करून तिजोरीत कवड्या ठेवू शकता.4 / 5वास्तूमध्ये आरसा खूप शुभ मानला जातो. असे म्हणतात की आरशात जे दिसते ते दुप्पट होते. म्हणून तिजोरीत उत्तर दिशेला छोटा आरसा लावावा. त्यामुळे पैशात वाढ होईल. 5 / 5लक्ष्मी मातेला लाल रंगाचे वस्त्र खूप प्रिय असते. म्हणून पौर्णिमा, धनत्रयोदशी किंवा दीपावली अशा कोणत्याही शुभ दिवशी तिजोरीत लाल कपड्यात ११ किंवा २१ रुपये बांधून ठेवा. दर महिन्याच्या पौर्णिमेला ते वस्त्र बदला. नक्कीच फरक पडेल. आणखी वाचा Subscribe to Notifications