शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Shastra: देवघरात कोणत्या मूर्ती किंवा फोटो ठेवणे अहितकारक ठरते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:05 PM

1 / 6
वास्तशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असले पाहिजे. देव्हाऱ्यात प्रस्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तींचा जीवनावर प्रभाव पडतो. देवघरातील मूर्ती वरद हस्त दर्शवणाऱ्या असाव्यात. त्यामुळे पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वाद रुपी भावमुद्रा पाहणे ऊर्जादायी ठरते. यासाठीच आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवणे योग्य ठरत नाही ते जाणून घेऊ.
2 / 6
देवी लक्ष्मी नेहमी पद्मासनात विराजमान असते. लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही असे वास्तू शास्त्र सांगते. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी व तिचे नित्य पूजन करावे, पण उभी मूर्ती ठेवू नये.
3 / 6
दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे. देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते. परंतू देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये. तसेच देवघरात काली मातेची प्रतिमाही ठेवू नये. नवरात्रीत तिची पूजा अवश्य करावी, मात्र कायमस्वरूपी ती प्रतिमा देवघरात ठेवणे चुकीचे ठरेल.
4 / 6
नटराजची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे. महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात. यामुळे देवघरात नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशची भावना वाढते. नृत्य शिकणारे अनेक जण या मूर्तीची पूजा करतात, परंतु घरात सुख-शांती हवी असल्यास नटराजची मूर्ती देवघरात ठेवू नये.
5 / 6
भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे. हा अविष्कार अत्यंत उग्र आहे. त्यांचे वाहन कुत्रा आहे. भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही. भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राख आणि तंत्र-मंत्राची आवश्यकता असते. प्रापंचिक व्यक्ती अशी सेवा करू शकत नाही, करणे अवघड जाते. म्हणून ही मूर्ती देवघरात ठेवू नये, त्याऐवजी शिवलिंग ठेवावे व त्याची पूजा करावी.
6 / 6
शनीदेवाची मूर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. शनीदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनीदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात....घरातही शनी प्रतिमा ठेवू नये असे म्हटले जाते. याउलट त्यांच्या मंदिरात जाऊन केलेली सेवा लवकर रुजू होते. याशिवाय एकाच देवाच्या दोन मुर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. अशामुळे नात्यांमधील ताण वाढतो....अधिक माहितीसाठी स्थानिक ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र