शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार घरात नदी, धबधबा, झरा यांची चित्रं लावण्याने होते मोठे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 11:24 AM

1 / 5
वास्तुशास्त्र आपल्या परिचयाचे, अभ्यासाचे नसेलही, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार, तर्क आपल्याला नक्कीच करता येईल. म्हणून युद्धाचे, प्रसंग, वाळवंट, गरिबी, काटेरी झुडपं, जंगली श्वापदे यांची चित्र ठेवू नयेत. तसेच निसर्ग चित्रांचीही तार्किक बाजू लक्षात घेऊन निवड करावी. जसे की झरा, धबधबा, समुद्र, नदी हे देखावे निसर्गात जाऊन पाहणे जितके सुखावह ठरतात, तेवढे घरातल्या चार भिंतींच्या तसबिरीत आकर्षक वाटत नाहीत. त्यातही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर त्याचे वाईट परिणाम लक्षात येतात.
2 / 5
कारंजे किंवा धबधब्याचे चित्र दिसायला सुंदर असते, परंतु असे मानले जाते की जसे पाणी वाहते तसेच आपले पैसे व्यर्थ कामांमध्ये खर्च होऊ शकतात. पैसा पाण्यासारखा वाहत जातो.
3 / 5
जलप्रपात किंवा कारंजेचे चित्र वास्तु शास्त्रज्ञांना विचारल्यानंतरच लावावे. ईशान्येकडील कोन निश्चित करण्यासाठी असे चित्र बर्‍याचदा वापरले जाते, परंतु अन्य कोठे हे चित्र लावताना सल्ला जरूर घ्यावा.
4 / 5
काही लोक मत्स्यालय ठेवतात किंवा त्या जागी माशाचे चित्र लावतात. परंतु तेही उचित जागेवर नसेल तर त्याचे अपाय आपल्या वास्तूवर पडतात. म्हणून कोणतीही गोष्ट घेताना ती केवळ शोभेची म्हणून वापरू नका, तर त्याचे घरावर, आरोग्यावर काय पडसाद पडतील, याची माहिती करून घ्या आणि मगच लावा.
5 / 5
समुद्र, निसर्ग यांचे चित्र लावणे कधीही फायदेशीर ठरते. समुद्राची विशालता डोळ्यांना सुखद वाटते आणि मनाला उभारी देते तर निसर्ग चित्र आल्हाददायक वाटते त्यामुळे मन प्रसन्न होते. निळाशार समुद्र, हिरवेगार रान यांचे चित्र लावावे.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र