शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips : जाणून घ्या किचनमध्ये कोणत्या दिशेला हवं फ्रिज, ‘या’ गोष्टींकडेही द्या लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:40 PM

1 / 9
वास्तूशास्त्रानुसार घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये फ्रिज हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि तो कोणत्या दिशेला आणि कुठे ठेवायचा हेही सर्वात महत्त्वाचे असते. यासोबतच चांगलं दिसेल अशा पद्धतीने फ्रिज ठेवावा, खोलीची रचनाही संतुलित असावी आणि वास्तूच्या नियमांनुसार असावी, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. फ्रिज ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तरच हे सर्व शक्य आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या विशेष गोष्टी.
2 / 9
एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रिज कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये. यासोबतच ते भिंती आणि कोपऱ्यांपासून किमान एक फूट अंतरावर असले पाहिजे. फ्रिज ठेवताना तुम्ही ही काळजी घेतली नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आजारांसोबतच आर्थिक समस्येला सामोरे जावे लागू शकते.
3 / 9
रिज नेहमी अशा प्रकारे ठेवावा की त्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही. विशेषतः उन्हाळ्यात याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासोबतच हेही लक्षात ठेवा की जर तुम्ही फ्रीज स्वयंपाकघरात ठेवत असाल तर त्याचे ओव्हन आणि मायक्रोवेव्हपासूनचे अंतर योग्य असले पाहिजे. मायक्रोवेव्हमधून बाहेर पडणारी उष्णताही फ्रीजसाठी चांगली मानली जात नाही.
4 / 9
तुम्हाला फ्रिज कोणत्या दिशेला ठेवायचा आहे, ते तुमच्या आवडीनिवडींवर अवलंबून आहे. तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्यांचे नाते सौहार्दपूर्ण राहावे आणि सर्व लोक एकमेकांसोबत आनंदाने राहावेत, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रिज पश्चिम दिशेला ठेवू शकता.
5 / 9
वास्तूनुसार फ्रिज ठेवण्यासाठी नैऋत्य ही दिशा उत्तम आणि शुभ मानली जाते. घरामध्ये फ्रिज कधीही उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवू नये. असे केल्याने लक्ष्मीची कृपा राहत नाही असे म्हटले जाते. याशिवाय फ्रिज कोणत्याही भिंतीला लागून ठेवू नका.
6 / 9
समोर दरवाजा असेल अशा ठिकाणी फ्रिज चुकूनही ठेवू नका. दरवाज्यासमोर फ्रिज असल्यानं सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात बाधा येते असे म्हटले जाते. यामुळे कुटुंबीयांमध्ये मानसिक तणाव आणि आर्थिक नुकसानीचीही शक्यता असते.
7 / 9
वास्तूमध्ये असेही मानले जाते की अस्वच्छ फ्रिज तुमच्या घरात अशांतता आणि नकारात्मक ऊर्जा वाढवतो. तुमचा फ्रिज आतून आणि बाहेरून अतिशय स्वच्छ ठेवला पाहिजे. शिजलेले शिळे अन्न अनेक दिवस फ्रिजमध्ये ठेवू नका. आरोग्यासोबतच वास्तूच्या दृष्टिकोनातूनही ते चुकीचेही मानले जाते.
8 / 9
किचनमध्ये फ्रीज ठेवताना लक्षात ठेवा की ते गॅस शेगडीजवळ नसावे. असे मानले जाते की गॅस स्टोव्ह अग्निचे प्रतिनिधित्व करतो, तर फ्रिज जल घटकाचे प्रतिनिधित्व करतो. दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात. त्यामुळे फ्रिज आणि गॅस स्टोव्हमध्ये चांगले अंतर असावे.
9 / 9
वास्तुशास्त्रानुसार फ्रीजमध्ये ठेवलेले दूध, पाणी आणि रंगीबेरंगी फळे आणि भाज्या तुमच्या समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात, जे नेहमी त्यांच्याकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. त्यामुळे फ्रिजमधून कधीही फळ किंवा भाज्या संपू देऊ नका.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजन