शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: नैऋत्य दिशेला बाथरूम-टॉयलेट नकोच; त्याचे परिणाम वाचा आणि दिलेले उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 1:54 PM

1 / 6
नैऋत्य दिशेला बाथरूम-टॉयलेट असावे की नाही हा प्रश्न अनेकांसमोर असतो. नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे. 'लाभदाययी वास्तू' या युट्युब चॅनेलवर वास्तू तज्ञ सुषमा पलंगे (संपर्क : ७२६२०८४६६५) सांगतात, 'या दिशेमध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. तिचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून त्या दिशेला बाथरूम टॉयलेट बांधू नये. त्या दिशेला पाणी वापरणे योग्य नाही, म्हणून ती दिशा मास्टर बेडरूमसाठी राखीव ठेवली आहे. त्याच्या जडत्त्वाचा प्रभाव त्या दिशेवर राहतो. याउलट त्या दिशेने पाणी गेल्यास नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
2 / 6
नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी असेल तर हरकत नाही, पण पाण्याचा वापर होणे योग्य नाही. तसे झाल्यास घरात सतत वाद, कटकटी, कलह निर्माण होऊन गृहसौख्य हरवते आणि वास्तू दोष निर्माण होतो.
3 / 6
याबरोबरच सामाजिक प्रतिष्ठा कमी होते, व्यवसायात अस्थिरता निर्माण होते. कारण पृथ्वीतत्त्वावर चंचल किंवा वाहत्या पाण्याचा वावर त्या दिशेतील अस्थिरता वास्तूमध्ये निर्माण करते.
4 / 6
नैऋत्य दिशेला टॉयलेट बाथरूम असल्यास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर दीर्घ आजार ओढवतात व त्यामुळे पूर्ण घरावरच अवकळा येते आणि सर्व कुटुंब सदस्यांची प्रगती थांबते.
5 / 6
पायाचे विकार, गुडघेदुखीसाठीदेखील ही रचना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तशी रचना टाळणे हेच इष्ट ठरते.
6 / 6
जर वास्तू नियमांचे पालन न करता वास्तू आधीच बांधून झालेली असेल तर त्याठिकाणी निदान खिडकी करून घेणे आवश्यक ठरते. तसेच वास्तू दोष टाळण्यासाठी घराच्या पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेला तुळशी वृन्दावन लावावे.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र