शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: ताटात एकाचवेळी तीन पोळ्या वाढू नका; वास्तू दोष निर्माण करणाऱ्या चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 3:15 PM

1 / 6
वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगितले आहेत, जे तुमच्या घरातील सुख-समृद्धीशी संबंधित आहेत. ज्यामुळे सकारात्मकता निर्माण होते. अन्नाचा थेट संबंध ऊर्जेशी असतो. त्यातून दोष निर्माण होऊ नये म्हणून टाळा पुढे दिलेल्या चुका!
2 / 6
हा नियम फक्त पितृ पक्षातच नाही तर आयुष्यभर पाळला पाहिजे. दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा आहे. पितृ पक्ष, श्राद्ध आणि पितरांची पूजा करताना आणि पितरांना दिवा देखील दक्षिण दिशेला लावला जातो, त्यामुळे ही दिशा पितरांसाठी असल्याने जिवंतपणी या दिशेला तोंड करून जेवू नये.
3 / 6
दक्षिण दिशा ही यमराजाची मानली जाते, तिथे स्वयंपाक घर असेल तर निदान ओट्याची दिशा बदला. ओटा दक्षिण दिशेला नसेल याची काळजी घ्या. अन्यथा त्या दिशेला उभे राहून केलेला स्वयंपाक नकारात्मक उर्जेला कारणीभूत ठरतो.
4 / 6
अनेक जण केवळ पितृपक्षातच नाही तर एरव्हीसुद्धा जेवायला बसण्याआधी देवाला नैवेद्य दाखवतात, मग गायीला, कावळ्याला, कुत्र्याला जेवू घालून मग जेवतात. तसेच चिमणीला दाणे, कावळ्यांना शेव, कबुतरांना धान्य घालत असाल तर या सर्व अन्नदानात दिशा दक्षिण तर नाही ना हे तपासून घ्या, अन्यथा दिलेल्या अन्नाचा सकारात्मक परिणाम होणार नाही, उलट त्यांच्या अनारोग्यासाठी तुम्ही जबाबदार ठराल.
5 / 6
मुळात स्वयंपाकघर दक्षिणेला असता कामा नये, तरीदेखील ते बदलता येण्यासारखे नसेल तर निदान ओट्याची जागा बदलून घ्या तसेच दक्षिण दिशेला अन्नधान्य ठेवू नका. ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या घारीरावर होऊ शकतो.
6 / 6
काही जणांना थोडं थोडं जेवण वाढून घ्यायची सवय असते, तर काही जण एकाच वेळी वाढून घेतात, पुन्हा अन्नाकडे फिरकत नाहीत. मात्र एकदाच वाढून घेण्याच्या नादात अतिरिक्त अन्न वाढून घेतले जाते. ताटात अन्न आल्यावर ते खरकटे होते. लागेल तेवढे न जेवता वाढले म्हणून, तसेच संपवायचे म्हणून जेवावे लागते. साधारण २ पोळ्या कोणीही खातं, पण तिसरी पोळी पोटाला जड होते आणि ती टाकली जाते. ती कोणाच्या मुखी लागावी, वाया जाऊ नये यासाठी पोळ्या एकत्र वाढण्याचा आग्रह करू नये. अन्न वाया घालवण्यानेही वास्तू दोष निर्माण होतो हे लक्षात ठेवा!
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रfoodअन्न