शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: ऑफिस डेस्कवर चुकूनही ठेवू नका 'ही' रोपं; तुमच्या प्रगतीत येऊ शकतो अडथळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 7:07 AM

1 / 7
काम करून थकवा येतो, आळस येतो म्हणून डोळ्यांना तजेला मिळावा यासाठी आपण ऑफिस डेस्क सजवतो. तिथे कधी आवडत्या व्यक्तीचा फोटो ठेवतो तर कधी आराध्य देवतेची प्रतिमा, सुगंधी फुले, उदबत्ती, अत्तर ठेवतो तर कधी छोटेसे रोपटे ठेवून तो कोपरा आकर्षित करतो. वास्तू शास्त्र सांगते, की या सजवटीत रोपांची निवड महत्त्वपूर्ण ठरते. ती कशी असावी पेक्षा कशी नसावी ते जाणून घेऊ.
2 / 7
घरामध्ये तसेच कार्यालयीन वातावरणात प्रत्येक गोष्ट वास्तूनुसार ठेवणे गरजेचे आहे. त्या वस्तूंमध्ये ऑफिसच्या डेस्कमध्ये ठेवलेली रोपं ऊर्जेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. त्या रोपांची निवड योग्य असेल तर तुमची प्रगती होईल मात्र चुकीची रोपं असतील तर प्रगतीत अडथळे येतील. रोपांची सकारात्मक स्पंदने टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे योग्य स्थानदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
3 / 7
निवडुंग ही अशी वनस्पती आहे जी काटेरी असूनही तिच्या अद्वितीय सौंदर्यासाठी ओळखली जाते. निवडुंगाचे अनेक आकर्षक प्रकार बघायला मिळतात. घरातील काही खास ठिकाणी हे रोप लावणे योग्य आहे, पण ऑफिसमध्ये हे रोप लावू नये असे वास्तुशास्त्र सांगते. असे म्हणतात, की हे रोप ऑफिसच्या डेस्कवर ठेवले तर त्याचे काटे तुमच्या आजूबाजूचे वातावरण नकारात्मक करू शकतात. या वनस्पतीचा तुमच्या उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही वनस्पती तुम्हाला आवश्यक असलेल्या सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात व्यत्यय आणू शकते, म्हणून कार्यालयात ती न ठेवणे चांगले.
4 / 7
बांबूला अनेकदा नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, परंतु जेव्हा आपण ऑफिस डेस्कवर ठेवण्याबद्दल बोलतो तेव्हा ते शुभ मानले जात नाही. वास्तूनुसार, ऑफिसच्या डेस्कवर बांबूचे रोप न ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून तुमच्या प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्याशी भांडण होण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की बांबूच्या तीक्ष्ण कडा कठोरपणाचे प्रतीक आहेत आणि कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण तयार करू शकतात.
5 / 7
तुळशी पवित्र मानली जाते आणि तिची पूजाही केली जाते. हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते, परंतु तिला ऑफिसमध्ये ठेवणे आपल्यासाठी चांगले नाही. असं मानलं जातं की ऑफिसमध्ये तुळशीचं रोप ठेवलं तर त्याची शुद्धता राखण्यात अडचण येते आणि त्यामुळे ते रोप सुकतं. जर तुम्ही तुळशीच्या रोपाची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा अपमान होतो, ज्यामुळे देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते. हे रोप घरामध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवावे, पूजा करावी, निगा राखावी पण ऑफिस मध्ये ठेवू नये.
6 / 7
कोरफड तशी बहुगुणी आणि झटपट वाढणारी वनस्पती. मात्र ऑफिस डेस्क हे तिचे स्थान नाही. घरातल्या गॅलरीत किंवा बागेत, परसात तिला ऐसपैस वाढू द्या, मात्र हौस म्हणून ऑफिस डेस्कवर तिला ठेवू नका. तिथे ठेवल्याने तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो आणि तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. असे केल्याने तुमच्या प्रगतीलाही बाधा येते आणि तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते. त्याचप्रमाणे ऑफिस मध्ये गुलाबाचा गुच्छ ठेवा पण गुलाबाचे रोप डेस्कवर लावू नका, कारण गुलाबालाही काटे असतात व ते प्रगतीला मारक ठरतात.
7 / 7
अलीकडे शोभिवंत झाडांमध्ये वाळलेल्या रोपांचाही समावेश केला जातो. ही रोपं निर्जीव तर दिसतातच पण वातावरणात रुक्षता आणतात. निदान ऑफिस मध्ये त्यांचा वापर टाळावा. अन्यथा तुमच्या करिअरमध्ये अडथळा येऊ शकतो.मृत वनस्पती क्षय आणि जीवनशक्तीच्या कमतरतेचे प्रतीक मानले जाते आणि त्यांची उपस्थिती नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. सकारात्मक आणि प्रवाही ऊर्जा प्रवाह राखण्यासाठी, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर तजेलदार रोपं ठेवली पाहिजेत.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र