शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips : आरोग्यावरील हानिकारक परिणाम टाळण्यासाठी 'या' पाच गोष्टी बेडरूममधून हद्दपार करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:23 PM

1 / 7
वास्तुशास्त्र हे केवळ घरबांधणीच्या नियमांपुरते मर्यादित नाही तर ते वास्तूत स्थित असलेल्या पंचमहाभूतांशी संबंधित आहे. त्यांचा परिणाम तिथे राहणाऱ्या लोकांवर होत असतो. म्हणून वास्तूची निर्मिती करताना दश दिशांचा पूर्वाभ्यास केला जातो.
2 / 7
अशा आपल्या वास्तूमध्ये सर्वात महत्त्वाचा कोपरा म्हणजे आपली बेडरूम. ती केवळ अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून चालणार नाही. कारण तेथील सजावटीपेक्षा त्या भागाशी निगडित नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. कारण आपल्या झोपेचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. नव्हे तर आपले आरोग्य आपल्या झोपेवर अवलंबून असते. त्यादृष्टीने आजच्या यंत्रयुगात वास्तुशास्त्राने दिलेले नियम अवश्य पाळा!
3 / 7
हे स्पष्ट आहे की वास्तुशास्त्र हे मुळात एक शास्त्र आहे, म्हणून तंत्रज्ञान त्याच्या यादीत आहे. कारण आज मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, झोपेत असतानाही तो आपल्या जवळपासच असतो. मात्र आरोग्याच्या दृष्टीने ते हितावह नाही. किमान झोपताना उशीखाली ठेवू नका. मोबाईल फोन सतत मोबाईल टॉवरच्या संपर्कात असतात, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तयार करतात. आपल्या फोनच्या सभोवतालचे रेडिएशन आपल्या मेंदूला हानी पोहोचवू शकतात म्हणून झोपताना ते दूर ठेवणे योग्य आहे. तसेच मोबाईलमुळे संवाद थांबून वादाला तोंड फुटते त्यादृष्टीनेही बेडरूम मध्ये फोन बेडपासून दूर ठेवणे इष्ट ठरते.
4 / 7
वायफाय राउटर मोबाईल फोनपेक्षा जास्त रेडिएशन निर्माण करतात. त्यामुळे बेडरूममध्ये वायफाय राउटर बसवणे टाळा. मात्र, दुसरा पर्याय नसेल तर किमान रात्री तरी तो बंद करा. दिवसभर त्या लहरींच्या क्षेत्रात आपला जास्त वावर नसला तरी झोपेच्या वेळी आठ तास त्या लहरींपासून आपल्याला स्वतःचा बचाव करता येईल.
5 / 7
सॉफ्ट टॉईज अर्थात फरची खेळणी आकर्षकरित्या मांडून तुमची खोली सजवणे ही चांगली कल्पना वाटू शकते, परंतु वास्तुशास्त्रानुसार ती चांगली योजना नाही. ती खेळणी कितीही मऊ किंवा गोंडस असली तरी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात. त्या खेळण्यांमध्ये केवळ वातावरणातील ओलावा, घाण आणि धूळ शोषली जात नाही, तर ती नकारात्मक भावना देखील निर्माण करतात. ती खेळणी तुमच्या बेडरूममध्ये ठेवल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला भयानक स्वप्ने आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.
6 / 7
हा एक आधुनिक शोध आहे, जो आजच्या पिढीतील स्टोरेजची समस्या सोडवतो. जे लोक अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांच्याकडे योग्य स्टोरेज स्पेस नाही, म्हणून लोक त्यांचे बॉक्स बेड सामग्रीने भरतात. त्यामुळे पलंगाखाली हवा मुक्तपणे फिरू शकत नाही अशा बेडवर झोपणे टाळावे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा या जड आणि गोंधळलेल्या जागेमुळे तुम्हाला नेहमी सुस्ती वाटते. म्हणून पूर्वीच्या घरात लाकडी किंवा लोखंडी पलंग असायचे जे खालच्या बाजून मोकळे असत.
7 / 7
बहुतेक लोकांना त्यांच्या पलंगाच्या मागे किंवा बेडरूममध्ये कुठेही भिंतीवर चित्र लावणे आवडते. जर पेंटिंगचे रंग चमकदार असतील किंवा आनंद दर्शवित असतील तर ते तुम्हाला शांत झोपायला नक्कीच मदत करतील. पण जर पेंटिंग गडद रंग किंवा नकारात्मक भावना दर्शवत असेल तर त्याचा तुमच्या मूडवर परिणाम होईल. त्यापेक्षा बेडरूममध्ये चित्र लावणे टाळा आणि लावायचे झाल्यास राधा कृष्णाचे, निसर्गाचे, फुलांचे चित्र लावा. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नातेसंबंधावर नक्कीच होईल.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHealthआरोग्य