शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: सायंकाळनंतर ही 5 कामे कधीच करू नये; श्रीमंतीकडून कंगालीकडे जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 11:23 AM

1 / 7
कुटुंबाच्या भल्यासाठी, विकासासाठी वास्तुच्या सिद्धांतांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. घराचे बांधकाम करताना जरी तुम्ही सर्व दिशा, दशा नीट केल्या असतील तरी घरा बांधल्यानंतरचे काही नियम न पाळल्यास कंगालीकडे वाटचाल होऊ शकते. सायंकाळच्या वेळी काही गोष्टी केल्या तर त्याचे दुष्परिणाम होतात, असे सांगतिले जाते.
2 / 7
सायंकाळच्या वेळी ही पाच कामे केली तर त्या घराला वास्तुदोषाने घेरले जाते. सायंकाळच्या या चुका घराती आर्थिक संपन्नतेला बाधा पोहोचवितात. वास्तुशास्त्रानुसार सुर्यास्तानंतर ही कामे न करण्याचा सल्ला दिला जातो.
3 / 7
वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी म्हणजे सुर्यास्तानंतर पैशांची देवाण- घेवाण न करण्याचा सल्ला दिला दातो. सुर्यास्तानंतर कोणाला उधारीवर पैसे देऊ नका, कोणाला उधार पैसे देऊ नका. असे म्हटले जाते की, सायंकाळी दिलेले पैसे परत तुम्हाला मिळत नाहीत. तसेच या काळात घेतलेल्या कर्जाचा बोजादेखील कधी उतरत नाही.
4 / 7
असे सांगितले जाते की तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. यामुळे सायंकाळी कधीही तुळशीची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते. असे केल्याने भगवान विष्णु नाराज होतात. सायंकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडल्यास रोग आणि आर्थिक समस्यांनी त्या व्यक्तीला घेरले जाते. त्याऐवजी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावण्यास सांगितले जाते.
5 / 7
वास्तू शास्त्रानुसार सुर्यास्तानंतर घरात कधीही झाडू मारू नये. यामुळे लक्ष्मी नाराज होते, असे सांगितले जाते. तसेच आर्थिक संकट तयार होते. जर कोणत्या कारणाने घरात झाडू मारावी लागली तर एकत्र केलेला कचरा घरातून बाहेर फेकू नये. तो गोळा करून ठेवावा, दुसऱ्या दिवशी सुर्योदयानंतर घरातून बाहेर टाकावा.
6 / 7
तिन्हीसांजेला घरात मच्छर, कीटक येतात म्हणून अनेकजण दरवाजा बंद ठेवतात. परंतू, या काळात घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये असे सांगितले जाते. लक्ष्मी घरात येण्याचा हा वेळ असतो. यामुळे दरवाजा बंद असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही.
7 / 7
वास्तू शास्त्रानुसार सूर्यास्त झाल्यानंतर घरात कधीही भांडणे करू नयेत. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. यामुळे कंगाली, गरीबी घेरण्यास सुरुवात करते. तसेच सायंकाळच्या वेळी कोणी गरीब व्यक्ती दारावर आला तर त्याला रिकाम्या हाताने माघारी पाठवू नये. आपल्या ऐपतीनुसार काही ना काही अवश्य द्यावे.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र