शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: घराच्या 'या' दिशेला लावा मनी प्लांट, तरच मिळेल संपत्ती आणि समृद्धीचा पूर्ण लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 7:00 AM

1 / 6
घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र ग्रहाचे पाठबळ वास्तूला लाभते. सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते. वातावरण प्रसन्न राहते. पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियमही देण्यात आले आहेत.या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. यासाठी त्याचे नियम जाणून घ्या.
2 / 6
मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मद्ध्ये लावावे. या दिशेचा स्वामी गणपती आणि प्रतिनिधी शुक्र आहे. गणपती विघ्नहर्ता आहे तर शुक्र ग्रह घरामध्ये धन, समृद्धी आणि सन्मान वाढवणारा आहे. म्हणूनच हे रोप आग्नेय दिशेला लावले पाहिजे. त्यामुळे घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि नकारात्मक लहरी दूर होतील.
3 / 6
मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजे ईशान्य दिशेला लावू नये. ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे. गुरु वैराग्याचा कारक आहे तर शुक्र भौतिक सुखाचा! त्यामुळे त्यांचे आपापसात वैर आहे. ईशान्य दिशेला मनी प्लांट ठेवले तर त्याची वाढ होत राहील पण फायदा मिळणार नाही. गिफ्ट मिळालेले मनी प्लांट जास्त शुभ ठरते. किंवा तुम्ही ते विकतही आणून लावू शकता.
4 / 6
मनी प्लँटचे रोप कोणी मागायला आले तर देऊ नका. आपण जशी मिठाची, केरसुणीची देवाण घेवाण करत नाही तशी मनी प्लांटची देवाण घेवाण करू नये. एकवेळ भेटवस्तू म्हणून हे रोप द्यावे, पण आपल्या कुंडीतील वेल कापून देऊ नये. मनी प्लांटच्या जवळ मोठ्या उंचीची रोपे ठेवू नये. त्यामुळे मनी प्लांटची वाढ खुंटते आणि सुकते. तसे होणे वास्तूच्या दृष्टीनेही अशुभ ठरते. म्हणून मन प्लांट स्वतंत्र जागेत ठेवावे आणि त्याच्या आसपास इतर रोपटी ठेवू नये.
5 / 6
मनी प्लांटची पाने सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत आणि झाडाच्या वेली जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी. कारण तसे होणे म्हणजे आर्थिक स्थितीचा ऱ्हास समजला जातो. म्हणून मनी प्लांटची वाढलेली वेल कापून कोणाला भेट द्या किंवा दोरीने ती वरचेवर बांधून ठेवावी. त्याऐवजी दोरी बांधा किंवा तिच्या वेलीला वर लटकवून तिला वरच्या दिशेने वाढू द्या. वेल वरच्या दिशेने जितक्या वेगाने वाढेल तेवढ्या वेगाने आर्थिक स्थिती वृद्धिंन्गत होते आणि समृद्धी मिळते. याउलट मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होतो.
6 / 6
कामाच्या ठिकाणीही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत ठेवा, या गोष्टी पैसा आकर्षित करतात आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार करतात. त्याच वेळी, या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका. असे केल्याने झाडाची वाढ खुंटते. वास्तूशास्त्रानुसार कोरड्या वनस्पतीला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र