शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: बेडरूमशी संबंधित 'या' पाच गोष्टी नवरा-बायकोच्या नात्यात पाडू शकतात फूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 2:17 PM

1 / 6
नात्यात ओलावा असेल तर आयुष्य सोपे होते. याचा अर्थ असा की जर तुमचा जोडीदार तुमच्या सर्व सुख-दु:खात तुमची साथ देत असेल तर तुम्ही हसतमुखाने दुःखावरही मात करू शकता. तुमच्या भावना समजून घेणारा जीवनसाथी तुम्हाला केवळ आधारच देत नाही तर तुमच्या कामात मदतही करतो. यामुळे एकी वाढते, सकारात्मकता निर्माण होते. पण काहीवेळा असे घडते की पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोषामुळेही असे होऊ शकते. ते टाळण्यासाठी पुढील गोष्टींचे पालन करा.
2 / 6
ज्या पती-पत्नींचे अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद होतात त्यांनी वास्तू दोषांची विशेष काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार झोपण्याच्या दिशेबद्दल सांगायचे तर झोपताना पती-पत्नीचे डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावेत. या उपायाने झोप नीट होते, मन शांत राहते आणि वादाचे प्रमाण कमी होत जाते.
3 / 6
वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने पूर्वेकडे पाय करून झोपू नये. यामुळे घरगुती कलहाबरोबरच आरोग्यासंबंधी समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार पूर्व दिशेला धार्मिक महत्त्व आहे. सूर्य पूर्वेकडून उगवतो, म्हणून पूजा, यज्ञ आणि भोजन पूर्वेकडे तोंड करूनच केले जाते. या दिशेला पाय ठेवून कधीही झोपू नये.
4 / 6
पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पश्चिम दिशेला झोपावे. अर्थात डोक्याची बाजू दक्षिणेकडे आणि पाय पश्चिमेकडे असावेत. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते.
5 / 6
पत्नीला वामांगी म्हटले आहे. वामांगी अर्थात पुरुषांची डावी बाजू. पुरुषाचे अर्ध अंग अर्थात जबाबदाऱ्या ती सांभाळते म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात. शिवाय उजव्या बाजूने सगळ्या गोष्टी सोयीस्कर वाटल्या तरी डावी बाजू सांभाळणे महत्त्वाचे असते, ते काम स्त्री करते म्हणून ती वामांगी! यासाठी नवऱ्याने बायकोच्या उजव्या बाजूला झोपणे आणि बायकोने नवऱ्याच्या डाव्या बाजूला झोपणे हितावह ठरते.
6 / 6
सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पती-पत्नीने आणखी काही वास्तु उपाय करावेत. उदाहरणार्थ, तुमच्या बेडरूमच्या भिंतींवर हलके रंग वापरावेत. यामुळे वातावरण प्रसन्न राहते. तसेच छोटे मोठे वाद होऊ नयेत या करीता बेडरूमची लादी पुसताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकावे. आणि भिंतीवर राधा कृष्णाची छबी, मोरपीस, लव्ह बर्ड्स यांसारख्या चित्रांचा वापर करावा.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र