शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: झोपेत घाम फुटून जागे होता? अनोळख्या स्पर्शाची होते जाणीव? ही तर वास्तूदोषाची लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 4:10 PM

1 / 6
रात्रीच्या वेळी निर्जीव वस्तूसुद्धा कधी कधी सावलीमुळे, अंधारामुळे भितीवह वाटू लागतात. किंवा अनामिक भीतीमुळे अनोळखे स्पर्श जाणवतात. त्यांचे अस्तित्व असते वा नसते हा वेगळा मुद्दा आहे, पण तसे जाणवण्यामागे कारण आहे, तो म्हणजे वास्तू दोष! नकारात्मक ऊर्जा! ही निर्माण होण्यामागे कारणीभूत असतो आपणच! अनावश्यक ठेवलेल्या वस्तू आणि त्यामुळे निर्माण होणारी नकारात्मक शक्ती, वास्तू दोष निर्माण करते. ती नेमकी कशामुळे होते ते पाहू.
2 / 6
अनेकदा घरात एखादे चित्र, शो पीस किंवा इतर कोणतीही वस्तू तुटली तर आपण त्याकडे लक्ष देत नाही. जर या गोष्टी खोलीत पडून राहिल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे या गोष्टी वेळीच काढून टाकणे लाभदायी ठरेल.
3 / 6
बेडरूममध्ये मृत नातेवाईकांची छायाचित्रे ठेवू नयेत. तुम्ही हे फोटो ठेवा किंवा हॉलमध्ये किंवा तुम्ही झोपत नसलेल्या खोलीत भिंतीवर लावा. शयनकक्षात मृत नातेवाईकांचे फोटो ठेवल्यानेही घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. संबंधित व्यक्तींच्या आठवणी किंवा त्यांच्या अस्तित्वाचे आभास होतात.
4 / 6
जर तुम्ही घरातील निरुपयोगी वस्तू एका बॉक्समध्ये किंवा गोणीत गोळा करून रद्दी विक्रेत्याला विकण्याचा विचार करत असाल तर ते भरून ठेवलेले सामान बेडरूम मध्ये ठेवू नका तर थेट हॉल मध्ये किंवा स्टोअर रूम मध्ये ठेवा आणि वेळेत त्याची विल्हेवाट लावा. अडगळीच्या वस्तू जास्त काळ घरात ठेवल्यानेही नकारात्मक ऊर्जाव वाढते.
5 / 6
वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला स्वतःचे महत्त्व आहे. उदाहरणार्थ, शुभ कार्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते. त्याचबरोबर पैशाशी संबंधित बाबींसाठी उत्तर दिशा चांगली मानली जाते. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. झोपताना पाय कधीही दक्षिण दिशेला नसावेत. वास्तुदोष होण्याचे हे देखील एक कारण आहे.
6 / 6
तुमच्या खोलीत बंद पडलेले घड्याळ असल्यास, ते वेळेत खोलीतून काढून टाकणे किंवा त्यांची दुरुस्ती करून घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. यामुळे तुमच्या घरातील वास्तू दोष दूर होतील. झोपण्याच्या खोलीत बंद घड्याळे ठेवू नयेत. विशेषत: तुमच्या घराच्या भिंतीवर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब काढून टाका.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र