Vastu Tips: Where the lotus blooms, Saubhaya Lakshmi rests; Plants that attract money like a magnet!
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं! By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 1:11 PM1 / 5कमळ हे लक्ष्मी आणि विष्णू यांचे प्रिय फुल आहे. दोघांच्याही पूजेत आठवणीने कमळ वाहिले जाते. मंगळवारी, शुक्रवारी आपण कमळ विकत आणून देवीला वाचतोच, पण तेच कमळ आपल्या घरात उमलले असेल तर? आपल्या घरातही सौभाग्य लक्ष्मी नांदेल असा विश्वास ज्योतिष अभ्यासक देतात. 2 / 5तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष आढळत असतील, किंवा वारंवार आजारपण येत असेल, झपाट्याने आर्थिक हानी होत असल्याचे जाणवत असेल तर वास्तू शास्त्र तसेच ज्योतिष शास्त्र निवडक रोपांची घरात लागवड करा असे सुचवतात. तुळस, मनी प्लँट, केळीचे रोप यांच्या यादीत लक्ष्मी कमळ हेही नाव सांगितले जाते. त्याबद्दल जाणून घेऊ. 3 / 5लक्ष्मी तथा विष्णू कमळ ओळखायचे कसे? तर ही कमी पाणी असलेली आणि डोंगरात भागात आढळणारी वनस्पती आहेत. त्यांना रसाळ वनस्पती देखील म्हणतात. तिची फुले कमळाच्या फुलांसारखी दिसतात. लक्ष्मी कमळाचा रंग हिरवा असतो तर विष्णू कमळाच्या पानांचा रंग बदलत राहतो. ते तपकिरी किंवा हलके लाल असू शकते.4 / 5लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारची निवड करावी. कारण हे दोन्ही दिवस दिल लक्ष्मी आणि नारायणचे दिवस मानले जातात. याशिवाय, तुम्ही त्यांना उत्तर दिशेला लावू शकता किंवा पूजास्थानी ठेवू शकता. ती फुलं दिसायला खूप सुंदर असतात. विशेष म्हणजे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते. त्यांना आठवड्यातून दोनदा हलके पाणी द्या आणि कधीकधी उन्हात ठेवा. जास्त पाणी देणे टाळावे हे लक्षात ठेवा. एवढे साधे सोपे नियम पाळले तरी लक्ष्मी आणि विष्णू कमळ छान फुलते, वाढते, टिकते. 5 / 5लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्याने घरात शांतता नांदते. दुसरे म्हणजे, लक्ष्मी आणि विष्णू यांचा घरात सदैव वास राहतो. यामुळे घरातील पैशाची समस्या दूर होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते. पैशांपाठोपाठ सुख समृद्धी घरात नांदते. हीच सौभाग्य लक्ष्मी वास्तूला आणि घरातील सदस्यांना भरभरून आशीर्वाद देते. आणखी वाचा Subscribe to Notifications