शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu tips: हातून मीठ सांडले तर नरकात जावं लागेल, असे आपले पूर्वज का म्हणत असत? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 3:29 PM

1 / 6
आजच्या काळात प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगत आहे, अशा परिस्थितीत अनेकवेळा घाईगडबडीत आपल्या हातून अनावधानाने काही चुका घडतात. याबाबत ज्योतिष शास्त्र सांगते...
2 / 6
मीठ : बालपणी आपल्या हातून मीठ सांडले की आई-आजी म्हणत, मिठाचा कण अन कण भरून घे नाहीतर नरकात जावे लागेल, पापण्यांनी मीठ भरावे लागेल. वास्तविक पाहता मिठाचे महत्त्व कळावे, ते हातून पुन्हा सांडू नये यासाठी हा धाक दाखवला जात असे. कारण मिठाशिवाय आपले जीवन अळणी आहे. अध्यात्मिक दृष्ट्या मिठाला महत्त्व आहे. मीठ समुद्रातून निर्माण होत असल्याने तो सागर पुत्र आणि लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. त्याचा अपमान हा लक्ष्मीचा अपमान समजला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार हातून मीठ सांडले तर आपल्या कुंडलीतील शुक्र आणि चंद्र कमकुवत होतात आणि वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात. तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
3 / 6
पूजा थाळी : पूजेचे ताट पडणे अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की देवाप्रती, पूजेप्रती तुमच्या मनात काही किल्मिष असते तेव्हा हे लक्षण दिसू शकते. ती पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून पूजेची थाळी, समई, दिवा, निरांजन यांची योग्य ती काळजी घ्यावी.
4 / 6
तेल : ज्योतिष शास्त्रानुसार हातातून वारंवार तेल सांडत असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे. तेल हे मारुती आणि शनीला प्रिय असते. तेल वारंवार सांडणे म्हणजे लक्ष्मीची अवकृपा होणे किंवा घरावर संकट ओढवणे. यासोबतच तेल वारंवार सांडल्यामुळे व्यक्ती कर्जबाजारी होऊ शकते.
5 / 6
दूध : गृह्प्रवेशाच्या वेळी दूध उतू घालवले जाते. कारण नवीन वास्तूमध्ये सुबत्ता नांदावी हा त्यामागचा हेतू असतो. मात्र भरल्या संसारात वारंवार दूध उतू जात असेल तर ते अशुभ लक्षण आहे. दुधाच्या नासाडीमुळे कुंडलीतील चंद्राचे स्थान कमकुवत होते आणि त्यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसतो. आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागते. यासोबतच सुख-समृद्धीवरही वाईट परिणाम होतो.
6 / 6
गहू किंवा तांदूळ सांडणे : नववधू गृहप्रवेश करताना तिच्या पावलांनी धन धान्य घरात भरभरून राहावे म्हणून धान्याचे माप उंबरठ्यात ठेवले जाते. मात्र अनावधानाने गहू, तांदूळ वारंवार सांडत असतील किंवा कीड लागून फेकावे लागणार असतील तर तो अन्नपूर्णेचा अपमान समजला जातो. अन्नपूर्णेची अवकृपा टाळण्यासाठी आणि वैभव लक्ष्मी रुष्ट होऊ नये यासाठी धान्याची नासाडी होणार नाही, सांडासांड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे!
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र