शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१८ जूनला महालक्ष्मी योग: बुध-शुक्र युतीचा ‘या’ ५ राशींना भाग्याची उत्तम साथ, भरभराटीचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 8:25 AM

1 / 12
जून महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून उत्तम मानला गेला आहे. जून महिन्यात ५ महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करणार आहेत. मात्र, बुध आणि शुक्राच्या युतीने तयार होणारा महालक्ष्मी योग अतिशय शुभ मानला गेला आहे. (venus and mercury conjunction in taurus 2022)
2 / 12
१८ जून रोजी शुक्र आपलेच स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह सुख, वैभव, भोग आणि विलासी जीवन यांचा कारक मानला गेला आहे. शुक्राचे स्वराशीत असणे उत्तम मानले गेले आहे. (mahalaxmi yoga 2022)
3 / 12
तर दुसरीकडे नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वृषभ राशीत मार्गी झाला आहे. मे महिन्यात याच राशीत बुध वक्री झाला होता. मात्र, बुधचे मार्गी होणे हे सकारात्मक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह भाषण, संवाद, बुद्धिमत्ता, तर्क क्षमता आणि व्यवसाय यांचा कारक मानला गेला आहे. (budh shukra yuti vrishabha rashi 2022)
4 / 12
वृषभ राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने एक अतिशय शुभ योग लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी योग असेही म्हणतात. या महालक्ष्मी योगाला ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान मानले गेले आहे. (lakshmi narayan yoga 2022)
5 / 12
ज्या लोकांच्या कुंडलीत या योगाचा प्रभाव असतो, त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि वैभव सहज प्राप्त होते, अशी मान्यता आहे. काही राशीच्या लोकांना बुध-शुक्र ग्रहांच्या संयोगाने तयार झालेल्या महालक्ष्मी योगाचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींना ही युती उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
6 / 12
बुध आणि शुक्र यांच्या युतीने तयार झालेल्या लक्ष्मी नारायण योगाचे अद्भुत लाभ मेष राशीच्या लोकांना मिळण्याचे संकेत आहेत. या कालावधीत अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. व्यवसायिकांना या योगातून चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. जमिनीच्या व्यवहारातून तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमची कीर्ती वाढेल. काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील.
7 / 12
कर्क राशीच्या लोकांनाही बुध-शुक्र ग्रहांच्या युतीने तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण योगाचा चांगला फायदा होईल. प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या योजनेवर काम करत आहात त्यात यशस्वी होण्याची वेळ आली आहे. तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरीत पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. परदेश प्रवास देखील शक्य आहे, जिथे तुम्हाला चांगली डील देखील मिळू शकते.
8 / 12
सिंह राशीच्या लोकांनाही बुध-शुक्र ग्रहांच्या युतीने तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण योगाचा शुभ लाभ होऊ शकेल. तुम्हाला नवीन नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळू शकतात. नोकरीत पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, जे लोक व्यवसायात कार्यरत आहेत, त्यांना व्यवसायात चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. या राशींवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असेल. ते जे काही प्रयत्न करतील त्यात त्यांना भरपूर यश मिळू शकेल.
9 / 12
वृश्चिक राशीसाठी लक्ष्मी नारायण योग खूप शुभ असणार आहे. या काळात, तुम्हाला नवीन स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल आणि याचा व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम उपयोग होऊ शकेल. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला ग्रह आणि नक्षत्रांच्या कृपेने अनेक शुभ संधी मिळतील. प्रेमात असलेल्यांना हा काळ खूप आनंददायी असेल. दाम्पत्य जीवन चांगले राहू शकेल.
10 / 12
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राची युती फायदेशीर ठरू शकेल. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल आणि दीर्घ प्रकल्पात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फलदायी ठरेल. नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. भावंड आणि मित्रांसोबत तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शिक्षणाकडे एकाग्रताही वाढलेली दिसेल. या काळात तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि व्यवसायात चांगली वाढ होईल.
11 / 12
नवग्रहांमध्ये न्यायाधीश मानला जाणारा शनी ५ जून रोजी कुंभ राशीत वक्री झाला आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल, तसेच नवग्रहांचा सेनापती मंगळ २७ जून रोजी आपलेच स्वामित्व असलेल्या स्व-राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल.
12 / 12
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, आपण याबाबतीत तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य