शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहु-शुक्राची युती: ३ राशींना अपार लाभ, ३ राशींना समस्यांचा काळ; ‘हे’ उपाय ठरतील खास!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 2:04 PM

1 / 10
रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह आताच्या घडीला मीन राशीत विराजमान आहे. मीन ही शुक्राची उच्च रास मानली गेली आहे. या राशीत याआधीच विराजमान असलेल्या गुरु ग्रहाशी शुक्र युतीत आहे. (venus rahu conjunction 2023)
2 / 10
शुक्र आणि गुरुच्या मीन राशीतील गोचराने मालव्य आणि हंस नामक राजयोग जुळून आले आहेत. आता होळीनंतर १२ मार्च २०२३ रोजी शुक्र मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीत राहु विराजमान असून, शुक्र आणि राहुची युती होणार आहे. एप्रिल महिन्यात शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल. (shukra rahu yuti 2023)
3 / 10
राहु आणि शुक्राच्या या युतीमुळे होळीनंतरचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय लाभदायक, शुभ असू शकेल. तर काही राशींसाठी आगामी काळ तापदायक, संमिश्र ठरू शकेल. कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा काळ चांगला ठरू शकेल, कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी, यावरील उपाय काय, जाणून घ्या...
4 / 10
मेष राशीच्या व्यक्तींना राहु-शुक्र युतीचा काळ संमिश्र ठरू शकेल. या काळात तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकेल. नात्यात तुमची फसवणूक होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही थोडे गोंधळात पडू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
5 / 10
वृषभ राशीच्या व्यक्तींना राहु-शुक्र युतीचा काळ संमिश्र ठरू शकेल.लव्ह लाइफमध्ये तुम्हाला खूप समजूतदारपणे निर्णय घ्यावे लागतील. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या बोलण्याने इतरांचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल. नवीन संबंधांमध्ये सावधगिरीने पुढे जावे लागेल.
6 / 10
मिथुन राशीच्या व्यक्तींना राहु-शुक्र युतीचा काळ फायदेशीर ठरू शकेल. पूर्वी केलेल्या कामाचाही यावेळी फायदा होऊ शकतो. आर्थिक आघाडी आणि व्यवसायात चांगला लाभ मिळू शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतील. व्यवसायात एखादा करार निश्चित केला जाऊ शकतो, ज्याचा फायदा आगामी काळात होऊ शकेल. शेअर्समध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
7 / 10
कन्या राशीच्या व्यक्तींना राहु-शुक्र युतीचा काळ संमिश्र ठरू शकेल. अडचणी वाढू शकतात. तुमचे बोलणे कठोर असू शकते. तुमच्या वागण्याने लोक अस्वस्थ होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. तुमच्या जोडीदाराला प्राधान्य द्या. जोडीदाराशी वाद, मतभेद टाळणे उपयुक्त ठरू शकेल.
8 / 10
तूळ राशीच्या व्यक्तींना राहु-शुक्र युतीचा काळ अनुकूल ठरू शकेल. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. तसेच भागीदारीच्या कामात चांगला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. यासोबतच कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.
9 / 10
मीन राशीच्या व्यक्तींना राहु-शुक्र युतीचा काळ संमिश्र ठरू शकेल. वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल. लव्ह लाईफमध्ये समस्या सोडवण्यात अडचणी येऊ शकतील. मात्र, अचानक धनलाभ होऊ शकतो. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. आर्थिक लाभही मिळू शकतात. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होऊ शकतील.
10 / 10
राहु आणि शुक्राच्या युती काळात प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत. दररोज सकाळी शुक्राच्या मंत्राचा जप करा. शुक्रवारी नियमित व्रत करावे. एखाद्या ज्योतिषाचा सल्लाने हिरा किंवा ओपल, शुक्राचे रत्न धारण करू शकता. राहु प्रभाव कमी करण्यासाठी गरजूंना अन्नदान करणे उपयुक्त ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य