venus retrograde in capricorn 2021 these 5 zodiac signs get benefits of shukra vakri in makar rashi
शुक्र मकर राशीत वक्री: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना मालामाल करणारा काळ; मिळतील अनेक लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 6:20 PM1 / 9ज्योतिषशास्त्रात ठराविक कालावधीनंतर मार्गी किंवा वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. डिसेंबर महिना धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात महत्त्वाचे ग्रह मार्गी किंवा वक्री चलनाने राशीपरिवर्तन करत आहेत. (venus retrograde in capricorn 2021)2 / 9नवग्रहांमधील महत्त्वाचा ग्रह म्हणजे शुक्र. सौंदर्य, कला, प्रेम यांचा कारक असलेल्या शुक्र ग्रह १९ डिसेंबर रोजी शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत वक्री गेला आहे. विशेष म्हणजे शनी ग्रहदेखील याच राशीत विराजमान आहे. (shukra vakri in makar rashi 2021)3 / 9शुक्राचे मकर राशीतील वक्री चलन सर्व राशींवर प्रभाव पाडणारे असले, तरी ५ राशीच्या व्यक्तींना हे वक्री चलन विशेष लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत आर्थिक आघाडी तसेच कार्यक्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग साध्य करता येऊ शकतील, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घेऊया...4 / 9शुक्रचे मकर राशीतील वक्री चलन मेष राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकते. आर्थिक आघाडी मजबूत करण्यासाठी उचललेली पावले योग्य ठरू शकतात. नवीन नोकरी, नवीन रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. कार्यक्षेत्रात चांगले अनुभव घेऊ शकाल. मात्र, कोणत्याही वादात पडू नये, असे म्हटले जात आहे.5 / 9शुक्रचे मकर राशीतील वक्री चलन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकते. आगामी काळ विद्यार्थ्यांसाठी यशकारक ठरू शकतो. आर्थिक पक्ष मजबूत होऊ शकेल. गुंतवणुकीतून उत्तम परतावा वा लाभ मिळू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनाही हा कालावधी नातेसंबंध सुधारणारा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. 6 / 9शुक्रचे मकर राशीतील वक्री चलन तूळ राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकते. आई-वडील, नातेवाईकांशी नातेसंबंध सुधारू शकतील. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. आर्थिक आघाडी चांगली होऊ शकेल. कर्जफेडीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होऊ शकतो. मात्र, आळस झटकून कामे करावीत, असा सल्ला दिला जात आहे. 7 / 9शुक्रचे मकर राशीतील वक्री चलन धनु राशीच्या व्यक्तींसाठी यशकारक ठरू शकते. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. कुटुंबातील सदस्यासोबत व्यवसाय, व्यापार करायची इच्छा असणाऱ्यांसाठी शुभ काळ. स्थावर मालमत्ता किंवा जमीन-जायदादशी संबंधित समस्यांचे निराकरण होऊ शकेल. योग्य मार्ग दिसू शकेल.8 / 9शुक्रचे मकर राशीतील वक्री चलन मीन राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. प्रवासातून लाभ संभवतो. फॅशन इंडस्ट्री, मीडिया किंवा चित्रपटाशी संबंधित व्यक्तींना आगामी कालावधी उत्तम ठरू शकेल. आर्थिक स्तरावर यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. भावंडांशी असलेले नाते दृढ होऊ शकेल. मात्र, आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले जात आहे. 9 / 9डिसेंबर महिन्यात नवग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह, नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह यांचेही राशीपरिवर्तन होत आहे. सूर्याने धनु राशीत प्रवेश केल्याने हे राशी संक्रमण धनु संक्रांत नावाने ओळखले जाते. तसेच या कालावधीला धनुर्मास असेही म्हटले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications