शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५६ दिवस शुक्र वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? कर्क गोचर तुमच्यासाठी कसे ठरेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 12:53 PM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीत वक्री असलेला शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे शुक्र अस्तंगत अवस्थेत वक्री चलनाने कर्क राशीत विराजमान झाला आहे. कर्क राशीत नवग्रहांचा राजा सूर्य विराजमान आहे. त्यामुळे शुक्र आणि सूर्य या दोन ग्रहांचा राजभंग नामक योग जुळून आला आहे.
2 / 15
वक्री चलनाने कर्क राशीत आलेला शुक्र ०४ सप्टेंबर रोजी मार्गी होत आहे. रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ०१ ऑक्टोबर रोजी पुन्हा सिंह राशीत प्रवेश करत आहे. सुमारे ५६ दिवस शुक्र कर्क राशीत असेल, असे म्हटले जात आहे.
3 / 15
शुक्राचा वक्री चलनाने कर्क राशीत झालेला प्रवेश कोणत्या राशींसाठी कसा ठरू शकेल? मेष ते मीन या सर्व राशींवर शुक्राच्या वक्री चलनाचा आणि कर्क राशीतील प्रवेशाचा प्रभाव कसा असेल? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैशांची बचत करण्यात अडचण येईल. खर्चही वाढू शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
5 / 15
वृषभ: घरगुती जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध बिघडू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल, तरच त्यांना यश मिळेल. धावपळ करावी लागू शकते. व्यावसायिक जीवनात काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे, घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा.
6 / 15
मिथुन: योजनांमध्ये काही बदल होऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांमुळे अडचणीत येऊ शकता. शिफ्टिंग करण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय पुढे ढकलणे चांगले. आर्थिक बाबींवर बोलायचे झाल्यास खर्चावर नियंत्रण ठेवा. भावंडांची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे दिलासाही मिळेल.
7 / 15
कर्क: प्रेम जीवनात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. मुलांच्या करिअर आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टींबाबत पालकांना काळजी वाटू शकते. मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. सासरच्या मंडळींशी संबंध थोडे अस्थिर होऊ शकतात.
8 / 15
सिंह: आपल्या भावना व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते. आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या किंवा गुंतवणूक योजना पुढे ढकला. कौटुंबिक वातावरण थोडे तणावग्रस्त होऊ शकते.
9 / 15
कन्या: वैवाहिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. कोणालाही कर्जाऊ पैसे देऊ नयेत. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. विनाकारण प्रवास करावा लागू शकतो. पैशाचा अपव्यय होऊ शकतो. गुंतवणूक टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा. ओळखीच्या लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे त्रास होऊ शकतो. मन अस्वस्थ होऊ शकेल.
10 / 15
तूळ: आरोग्याची काळजी घ्यावी. कोणालाही पैसे देणे टाळा. वैयक्तिक जीवनातही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अनेक अडचणी येऊ शकतात. एखाद्या गोष्टीवरून कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण बिघडू शकते.
11 / 15
वृश्चिक: कोणत्याही प्रकारची वचनबद्धता टाळा. अनेक समस्या निर्माण करू शकतात. नोकरी, व्यावसायिकांना कठोर परिश्रम केल्यावरच यश मिळेल. गुरू आणि मोठ्या भावासोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. शेजाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. वागण्यावर आणि भाषेवर नियंत्रण ठेवा. मुलांच्या एखाद्या गोष्टीबद्दल काळजी वाटेल परंतु परिस्थितीवर हुशारीने नियंत्रण ठेवाल.
12 / 15
धनु: परदेशी जाण्याचा बेत रद्द होऊ शकतो. मनाला आराम आणि शांतता मिळेल. भावंडांसोबत संबंध चांगले राहतील. अनेक घरगुती कामात सहकार्य मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आव्हानांना सामोरे जावे लागू शकेल. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कामे बिघडू शकतात.
13 / 15
मकर: प्रियजनांशी संभाषण करताना भाषेवर नियंत्रण ठेवा, अन्यथा संबंध बिघडू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी डोळे व कान उघडे ठेवावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. पालकांकडून विरोध होऊ शकतो. वाद होऊ शकतात. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे कामात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
14 / 15
कुंभ: आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्या. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. वादविवादापासून दूर राहा. व्यवसायात लक्ष घालावे. नोकरदारांनी इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळावे. अन्यथा कामाच्या ठिकाणी प्रतिमा मलिन होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरू शकेल.
15 / 15
मीन: वैवाहिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. गुप्त गोष्टी मित्रांना सांगणे टाळा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. भावनिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचणी येऊ शकतात. अशा कोणत्याही कामापासून दूर राहा, ज्यामुळे सामाजिक प्रतिमा खराब होईल. व्यापार्‍यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य