शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचा कर्क राशीत प्रवेश: ९ राशींवर अपार कृपा, महिनाभर लाभच लाभ; मंगळाची युती शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:46 AM

1 / 15
रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीतून चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत विराजमान होत आहे. सुमारे महिनाभर शुक्र कर्क राशीत असेल. मे महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र मिथुन राशीत विराजमान झाला होता.
2 / 15
३० मे रोजी कर्क राशीत शुक्राने प्रवेश केला असून, साधारण ०७ जुलैपर्यंत शुक्र याच राशीत विराजमान असेल. आताच्या घडीला कर्क राशीत नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ विराजमान आहे. त्यामुळे कर्क राशीत शुक्र आणि मंगळाची युती होत आहे. मंगळाशी युती तसेच कर्क राशीतील शुक्राचा प्रवेश अतिशय शुभ मानला गेला आहे.
3 / 15
शुक्राचा कर्क राशीत झालेला प्रवेश सर्व राशींवर प्रभाव पाडणारा आहे. मात्र, ९ राशींना या गोचराचे अनेविध लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. नोकरी, करिअर, बिझनेस, कुटुंब, कार्यक्षेत्र यांमध्ये यश, प्रगतीच्या संधी, सुख-समाधान प्राप्त होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. शुक्राचा कर्क प्रवेश तुमच्यासाठी कसा असेल? सर्व राशींवरील प्रभाव जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश सुख, शांतता आणणारा ठरू शकेल. कुटुंबाची काळजी घ्याल. प्रेम जीवनात विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. नोकरीच्या नवीन संधीही निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती करू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी. मनोरंजनाची नवीन साधने मिळू शकतात. कुटुंबातील सदस्य तुमचा आदर करतील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश शुभ परिणाम देणारा ठरू शकेल. छोटे प्रवास लाभदायक ठरू शकतात. भावंडांशी संबंध सुधारू शकतील. कुटुंबात सर्वजण एकत्र राहतील. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी संबंध चांगले राहतील. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. काही नवीन विचार करून पुढे जाऊ शकाल. वाचन आणि लेखनाचा छंद वाढेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश आनंददायी ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद वृद्धिंगत होऊ शकेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाहुण्यांचे आगमन होईल. वडिलोपार्जित व्यवसायात लाभ होऊ शकेल.
7 / 15
कर्क राशीत शुक्र विराजमान होत आहे. या राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर अनुकूल ठरू शकेल. मनात चांगले विचार येतील. चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकेल. नोकरीत तुमची स्थिती खूप चांगली असू शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हे संक्रमण चांगले ठरू शकेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. परदेशात जाण्याची चांगली संधी मिळू शकेल. पगार वाढू शकतो. एखादे गॅझेट खरेदी करू शकता. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. स्वतःची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्याचे भरपूर सेवन करणे लाभाचे ठरू शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश चांगल्या संधी घेऊन येणारा ठरू शकेल. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. विवाहासाठी चांगली स्थळे येऊ शकतात. मित्राच्या सल्ल्याने काही काम केले तर फायदा होऊ शकेल. पैशांची चणचण दूर होऊ शकेल. काही योजनांमध्ये यशस्वी व्हाल. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. आर्थिकदृष्ट्या चांगले योग जुळून येऊ शकतील.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. नोकरीत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांनी स्वतःची अधिक काळजी घ्यावी. व्यवसायिकांना व्यवसाय विस्ताराची चांगली संधी आहे. तब्येतीची थोडी काळजी घ्यावी. कामात प्रगती होऊ शकेल. पदोन्नती होऊ शकेल. वडिलांसोबतचे नाते सौहार्दपूर्ण असेल. नवीन संधी मिळू शकतात. प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश सुखकारक ठरू शकेल. जीवनात आनंद वाढू शकेल. लांबचे प्रवास करावे लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांचे अधिक प्रेम मिळेल. काही नवीन लोक भेटतील. आर्थिक लाभ मिळू शकतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये लाभ मिळू शकेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात तणाव राहू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पैसे गुंतवणे चांगले राहणार नाही. बदनामी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी महिलांशी चांगले वागावे, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश वैवाहिक जीवनात आनंद वाढवण्यास सिद्ध होऊ शकेल. व्यवसाय पुढे नेण्यात यश मिळू शकेल. फायदा होईल. जोडीदाराचे म्हणणे ऐकूनच निर्णय घ्या. त्याचा लाभ मिळू शकेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, ते योग्य ठरेलच असे नाही.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. नोकरीत काही अडचणींना सामोरे जावे लागू शकेल. आरोग्य चांगले राहील. बाहेरचे जास्त खाणे टाळा. वडिलोपार्जित संपत्ती वादाचे कारण बनू शकते. जितके जास्त काम कराल तितका फायदा होईल. नियमित व्यायाम करावा. पाण्याचे भरपूर सेवन करणे लाभाचे ठरू शकेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कर्क प्रवेश चांगले ठरू शकेल. शिक्षणाकडे खूप लक्ष द्याल. यातून खूप काही मिळेल आणि फायदाही होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करू शकता. यातून लाभ मिळू शकतील. बुद्धीचा विकास होऊ शकेल. चांगल्या मार्गाने प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य